या वर्षीच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. मात्र असे असतानाही राज्यातील अल्पसंख्यांक समाजाला सरकारने राबविलेल्या योजनांचा लाभ मिळत नाही. यामागे त्यांना त्या योजनांची माहिती मिळत नाही हे महŸवाचे कारण असल्याचे दिसून येते. यासाठी सरकारने अल्पसंख्यांक समाजासाठी विकासाच्या ज्या योजना आहेत त्यांना व्यापक प्रसिद्धी देणे आवश्यक आहे.
शासनाने मंत्रालयात अल्पसंख्यांकांसाठी स्वतंत्र अल्पसंख्यांक विभागाची स्थापना केलेली असली तरी मंत्रालय स्तरावर या योजना राबविल्या जात नाहीत. मंत्रालयातून स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उपलब्ध करून दिला जातो. याचा विचार करता अल्पसंख्यांक समाजाला या योजनांचा लाभ मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ’स्वतंत्र अल्पसंख्यांक कक्ष‘ स्थापन करणे गरजेचे आहे, हे कक्ष स्थापन करण्यासाठी सरकारने योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी मागणी, आमदार संदीप नाईक यांनी केली आहे.