|
आमदार या नात्याने मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी तुमच्या पाठीशी सदैव उभा राहीन, अशी ग्वाही ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांनी आज दिली. ‘आमदार आपल्या प्रभागातङ्क या उपक्रमांतर्गत आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबई पालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. १ आणि २ च्या आज दौरा केला. याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. महिलावर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. नागरी समस्यांच्या पूर्ततेबरोबरच युवकांना रोजगार देण्यासाठी आणि महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात लवकरच एक नवीन योजना आखण्यात येईल,असेही आ. नाईक यांनी सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर सुरू क‹रण्यासाठी पाठपुरावा करण्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
या दौèया दरम्यान प्रभाग क्रमांक १चे नगरसेवक भोलानाथ ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे शहर सरचिटणीस अनंत ठाकूर, फ-विभाग समितीचे सदस्य ललित वर्मा, अक्षय ठाकूर, रामनगरेप्रभागाचे वॉर्ड
|
अध्यक्ष मिqलद जाधव, ब्रिजेश qसग, हरेश वाघ, पालिकेचे उपअभियंता पानपट्टे, पालिका अधिकारी विटावकर, अधिकारी सोनावणे, महावितरणचे विभागीय कनिष्ठ अभियंता मैथनिय आदी उपस्थित होते.
एमआयडीसी, सिडको आणि महापालिकेने बालीनगर, ईश्वरनगर, रामनगर, गणपतीपाडा या प्रभाग क्र. १ व २ मधील शासनाच्या जमिनींवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांना नोटीसा बजाविल्या आहेत. सन २००० सालापर्यंतच्या आणि नंतरच्याही नागरिकांना नोटिसा आल्या आहे, असे नगरसेवक ठाकूर यांनी आमदार संदीप नाईक यांच्या निदर्शनास आणून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर नाईक यांनी उल्हासनगरच्या धर्तीवर येथील झोपड्या नियमित करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगून येथील झोपड्याही कायम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले. नवी मुंबईतील आणि या प्रभागातील कोणत्याही नियमानुरूप बांधण्यात आलेल्या झोपडीवर कारवाई होणार नाही. यासाठी आपण प्रसंगी संघर्ष करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ज्या नागरिकांनी आपल्या झोपड्यां विषयी संबंधित कागदपत्रे प्रशासनाकडे सादर केली नसतील, अशा नागरिकांनी त्वरित कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
ईश्वरनगर विभागात आरोग्य केंद्र उभारावे, ईश्वरनगर (अनंतनगर) ते वाशी बसडेपो महापे मार्गे परिवहनसेवा सुरू करावी, ईश्वरनगर विभागात नवीन स्वच्छतागृह बांधावे. सार्वजनिक वाचनालय सुरू करावे. समाजमंदिराची उभारणी करावी. अशा मागण्या नगरसेवक ठाकूर यांनी केल्या.
प्रभाग क्र. १ आणि २ च्यालगत रेल्वेने आपली सीमा निश्चित केलेली नाही. त्यामुळे येथील रेल्वे रूळालगत असणाèया झोपड्यासंदर्भात फ प्रभाग समितीचे सदस्य वर्मा यांनी विषय मांडला. त्यावर या प्रश्नी सीमाकंन करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाबरोबर बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन आ. नाईक यांनी दिले. ठाणे-बेलापूर मार्गावरील या दोन प्रभागात अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता आवश्यक त्या ठिकाणी स्कायवॉक उभारण्यासाठी पाठपुरावा करू,असे अभिवचन आ. नाईक यांनी दिले. आनंदनगर येथे ठाणे महानगरपालिकेची कै. सावित्रीबाई ठाकूर शाळा असून या शाळेत शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी नवी मुंबईतील आहेत. ठाणे महापालिकेचे या शाळेकडे दुर्लक्ष झाले असून नवी मुंबई महापालिकेकडे ही शाळा हस्तांतरीत करून घेण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासनही त्यांनी दिले. समाजमंदिरासाठी
एमआयडीसी, सिडको यांच्याकडे मोकळा भूखंड मिळावा याकरिता प्रयत्न करणार आहे. त्याकरिता मोकळ्या भूखंडांचे सर्वेक्षण व्हायला हवे, असे मत आ.नाईक यांनी मांडले.
प्रभाग क्र. २ मधील समस्या नागरिकांनी आमदार महोदयांसमोर मांडल्या. सावित्रीबाई फुले नगर येथे स्वच्छतागृहाची गरज असल्याचे सांगितले. प्रवाशांच्या सोयीसाठी सावित्रीबाई फुलेनगर येथे बसथांब्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. शाळेतील मुलांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉकची गरज विशद केली. या प्रभागात महिलांचे बचतगट मोठ्या संख्येने असून त्यांच्यासाठी उद्योग निर्मितीकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमदारांना साकडे घालण्यात आले. बोरला तलावाच्या सुशोभिकरणाची येथील नागरिकांची जुनी मागणी असून ती आमदार नाईक यांनी जातीने लक्ष घालून पूर्ण करण्याची मागणी मिqलद जाधव यांनी केली.
|
|
|