वाहतुकविषयक समस्यांचा पाहणीदौरा

ऐरोली मतदारसंघात सुरु असलेली रस्ता दुरुस्तीची सर्व कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१मे पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश आमदार संदीप नाईक यांनी आज दिले. ऐरोली येथील जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या महत्वाच्या बैठकीत आ.नाईक यांनी वाहतुकविषयक समस्यांचा आढावा घेतला आणि त्यानंतर प्रत्यक्ष पाहणीदौराही केला.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नासीर पठाण, महापालिकेचे शहरअभियंता मोहन डगावकर,


उपशहर अभियंता सुरेद्र पाटील, वरिष्ठ अभियंता नेरपगार,वाहतुक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रसाद गोकुळे, पोलिस निरिक्षक वसंत झुंजारे, महावितरणचे अधिकारी श्री पवार, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अनंत सुतार, नगरसेवक सुधाकर सोनावने, नगरसेवक बाळकृष्ण पाटील, नगरसेवक तात्या तेली, परिवहन समितीचे सभापती चंद्रकांत आगोंडे, परिवहनचे व्यवस्थापक श्री मंगळे,नगरसेवक अशोक पाटील, परिवहनचे सदस्य उमाकांत नामवाड, राष्टड्ढवादी युवक काँगेसचे शहरअध्यक्ष जयेश कोंडे,जिल्हा सदस्य जी.एस.पाटील, राष्टड्ढवादीचे तालुका अध्यक्ष जिवन पाटील, पालिकेच्या फ प्रभाग समितीचे सदस्य दीपक पाटील, ज्येष्ठ पत्रकार विकास महाडीक, समाजसेवक अनंत ठाकुर आदी अधिकारी,पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.

नागरी कामे वेळेत पूर्ण करुन नागषरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन आमदार नाईक यांनी बैठकीत केले. ऐरोली-पामबीच विभागातील अतंर्गत मार्गांवर अवजड वाहनांची वर्दळ असते. येथील रस्ते लहान असल्याने हि अवजड वाहने अपघातांना निमंत्रण देतात. या वाहनांना येथे प्रवेश न देण्याची सुचना त्यांनी केली. या भागातील अनधिकृत दुकाने आणि फेरिवाल्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. हा खोळंबा दूर करण्यास सांगितले.

ऐरोली आणि वाशी भागात पाकरीगची मोठी समस्या आहे. सिडकोचे भुखंड ताब्यात घेऊन त्यावर पाकरीग आणि वाहनतळ उभारण्याच्या सुचना केल्या.

पटणी आणि दिवा सर्कल येथील रस्ते आणि पदपथांवरील दिवे बंद असतात, अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी बैठकीत केली असता येत्या आठ दिवसांत हे सर्व बंद दिवे सुरु करण्याचे आदेश दिले. ऐरोलीला सुनियोजित शहर बनविण्यासाठी सर्व प्राधिकरणाच्या अधिकाèयांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन आमदार नाईक यांनी यावेळी केले. ऐरोली, रबाळे, घनसोली भागात गतीरोधक उभारण्याची सुचना केली. महत्वांच्या रस्त्यांवर दिशादर्शक उभारा. जेणकरुन बाहेरुन नवी मुंबईत येणाèया वाहनचालकांना ते नक्की कोणत्या भागात आहेत याचे ज्ञान होईल, असेही ते म्हणाले.

प्रत्येक महिण्यात आमदार महोदय वाहतुकीच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी एक बैठक घेणार आहेत. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी मतदारसंघातील इतर ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी बैठक घेणार आहेत. शहरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे पोलिस अधिकाèयांनी आमदार महोदयांच्या लक्षात आणून दिले असता रस्ता दुरुस्तीची जी काही कामे शहरात सुरु आहेत, ती ३१मे पर्यंत पूर्ण करा आणि पावसाळ्यात कोणतेही नवे काम हाती घेऊ नका, असा आदेश पालिकेच्या अधिकाèयांना दिला.

रबाळे येथील नवी मुंबई परिवहन बससेवेच्या डेपोचा विषय परिवहन सभापती अगोंडे यांनी उपस्थित केला. याविषयीचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत येणार असून हा डेपो आधुनिक असावा असे सांगून त्याचा आराखडा पालिका अधिकाèयांना तयार करण्यास सांगितले. बसनिवारा शेड बांधण्यासाठी आमदार निधी देणार असल्याचेही त्यांनी बैठकीत नमूद केले. कामे करताना अधिकाèयांमध्येच अनेकवेळा समन्वय नसतो. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत, याबद्दल आमदार नाईक यांनी खंत व्यक्त करुन एक जबाबदार नागरिक म्हणून अधिकाèयांनी आपले कर्तव्यपालन कŸरावे, असा सल्ला दिला.

रबाळे पोलीस ठाण्याजवळील रबाळे पुलाशेजारी वाहतुकीची कोंडी पहाता याठिकाणी भविष्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र भुयारी मार्ग निर्माण करण्यावर विचार करणार असल्याचे ते म्हणाले. वाहनांना टोचन करण्यासाठी वाहतुक नियंत्रण पोलीसांकडे टोईंगव्हॅनची कमतरता असल्याची बाब वाहतुक पोलीसांनी सांगितल्यावर त्यासाठी पोलीस आयुक्तांना पत्र देऊन शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. पोलिस स्वतहून करीत असलेल्या सुचनांचे स्वागत करुन आमदार नाईक यांनी त्यांचे कौतुक केले.

तळवली नाका-ऐरोली मार्ग घनसोलीपर्यंत टू-वे होऊ शकतो का याविषयीचा फिजिबिलीटी रिपोर्ट तयार करा, ऐरोलीत सम विषम पाकर्गचे बोर्ड लावून त्याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करा, पदपथ अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाèया गॅरेजेसवर कारवाई करा, तळवली- घनसोली येथील टड्ढान्सफार्मर हटवा, ठाणे-बेलापूर मार्गावरील महापे पुलाखालील सिग्नलच्या वेळा वाढवा अशा सुचना आमदार नाईक यांनी बैठकीत केल्या. रबाळे घनसोली येथील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश देऊन जे नियमात बसतात त्यांचे पुनर्वसन करावे आणि इतर विनापरवाना बांधकामधारकांबरोबर चर्चा करुन १५दिवसांच्या आत त्याचा अहवाल पालिकेच्या अधिकाèयांना सादर करण्यास सांगितले. पामबीच-घनसोली-मुलुंड हा रस्ता खारफुटींमुळे रखडला आहे. याविषयी आमदार नाईक यांनी बैठक बोलाविणार असल्याची माहिती दिली. महापे पुलावरुन आखणी एक पुल बांधल्यास ठाणेकडे जाणाèया वाहनांना सिग्नल न लागता ती थेट या पुलावरुन निघून पुढे जातील. या पुलाचा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दिवा सर्कल येथील घाडी मैदानाजवळील रस्त्यावर दुचाकी वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे या रस्त्यावर दुचाकींना प्रवेशबंदी करण्याची सुचना केली. येथे केवळ नागरिकांना प्रवेश असावा, असे मत मांडले. ऐरोली-दिवा मार्ग मोठा होईल काय, याविषयी फिŸजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्यास सांगितले.

बैठक पार पडल्यानंतर आमदार नाईक यांनी ऐरोलीतील सेक्टर१५, १७, ५ आणि ३सह विविध भागांचा प्रत्यक्ष पायी पहाणीदौरा केला. रस्त्यांवर झाडांची झालेली छाटणी, बंद qसग्नल आदी समस्या त्वरीत सोडविण्याचे निर्देश दिले. नगरसेवक अशोक पाटील यांच्या प्रभागात आधुनिक मासळी बाजार निर्माण करण्याची सुचना देऊन त्यासंबंधीचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यास पालिकेच्या अधिकाèयांना सांगितले. ऐरोली, दिवा येथील स्कायवॉकची त्यांनी पाहणी केली. ३१मे पर्यत या स्कायवॉकचे काम पूर्ण करण्याची सुचना केली. ७५टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती शहरअभियंता डगावकर यांनी आमदार नाईक यांना दिली.