त्यावेळी आ. नाईक बोलत होते. या कार्यक्रमाला रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष दिनेश पारख, ऐरोली पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष अरविंद माने, राष्ट्रवादीचे जिल्हा सदस्य जी.एस.पाटील, जीवन पाटील, परिवहन सदस्य उमाकांत नामवाड, वार्ड अध्यक्ष मिलींद पाटील, समाजसेवक मोहन मढवी, वत्सलाताई कांबळे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष कौशल मिश्रा, पत्रकार संघाचे सल्लागार प्रमोद इंगळे, गणेश बच्छाव, दिपक काळे, मनिष पोळेकर, शरद वागदरे आदी पत्रकार उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. नाईक म्हणाले की, ग्रीन होप संस्थेमार्फत ग्रीन मिशन 2011 अंतर्गत शहरात 1 लाख झ्ााडांची लागवड करण्यात येणार आहे. केवळ झ्ााडांची लागवड हाच उद्देश नसून त्यांचे जतन तसेच पक्षी, आकाश आदींबाबत नागरिकांना पुरेपूर माहिती उपलब्ध करून देणे हा ग्रीन होपचा पुढील उपक्रम आहे. ग्रीन होपच्या या उपक्रमाला शालेय विद्यार्थी, सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी मोठ्य्ाा प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. नवी मुंबई शहर 2015 पर्यंत हरित करण्याचा संकल्प हा तत्पूर्वीच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद हा आनंददायी असून रेल्वे प्रवासी संघटना आणि ऐरोली पत्रकार सेवा संघ यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आल्याबद्दल आमदार नाईक यांनी त्यांचा गौरव केला. सर्वांना अभिप्रेत असणारे चांगले कार्य नवी मुंबईतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी करीत आहेत. नवी मुंबईतील सर्व घटक एकत्र आल्यास शहराचा कायापालट होण्यास मदत होईल, असे आ. नाईक म्हणाले. प्रत्येक नागरिकाने एक झ्ााड लावून त्याचे कायमस्वरुपी राहिल या पद्धतीने जतन केल्यास भविष्यात भेडसावणारा ग्लोबलवार्मिंगचा धोका टळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिनेश पारख यांनी रेल्वे प्रवाशांच्या संदर्भातील विविध मागण्या यावेळी आमदारांकडे सादर केल्या. ऐरोली पत्रकार सेवा संघाच्या वतीने पत्रकारांना ऐरोली येथे स्वतंत्र कक्ष देण्याची मागणी करण्यात आली होती. याविषयी बोलताना लवकरच पत्रकार कक्ष उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.