राबाडागाव येथील महानगरपालिका शाळा क्र. 36 व 46 येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमिŸााने राबाडागाव-दŸामंदिर परिसरातून लेझ्ाीम, ढोल, ताशाच्या गजरात भव्य वृक्ष दिंडी काढण्यात आली होती. दहशतवांद्याच्या मुंबईवर झ्ाालेल्या भ्याड हल्ल्यामुळे कोणतेही गाजावाजा करणारे कार्यक्रम वाढदिवसाच्या दिनी ठेवू नयेत असे सक्त आदेश आ. नाईक यांनी कार्यकत्र्यांना दिले होते.त्यामुळे विद्याथ्र्यांना प्रेरणा देणारा आणि समाजोपयोगी हा उपक्रम राबाडा येथे आयोजित करण्यात आला होता.
राबाडा गाव परिसरातून पर्यावरणाचा संदेश देत मराठमोळया वेशभूषेत शालेय विद्याथ्र्यांनी वृक्षदिंडी काढली. आ.नाईक यांनीही या दिंडीत स्वतरू दिंडी खांद्यावर घेऊन विद्याथ्र्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या समवेत महापालिका शाळा क्र. 36 व 46 मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. राबाडा गाव परिसरात राहणाÚया आणि 10 वी व 12वीच्या परीक्षेत सुयश मिळविणाÚया उŸारा गजानन राऊळ, शामल अर्जुन राऊळ, अक्षता शंकर गुरव, ओमनारायण तिवारी, सतिश गुप्ता, सुमित पवार आदी विद्याथ्र्यांना गौरव पत्रक आणि शालोपयोगी साहित्य देऊन आमदारांच्या हस्ते गौरविण्यात आले.
उपस्थित विद्यार्थी तसेच कार्यकत्र्यांना मार्गदर्शन करताना आमदार नाईक यांनी ग्लोबल वार्मिंगचा भविष्यातील धोका टाळण्यासाठी ग्रीन होपच्या माध्यमातून सुरू असणाÚया वृक्षारोपण मोहिमेची माहिती दिली. यात शालेय विद्यार्थी नागरिकांच्या वाढत्या सहभागाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांना अभिप्रेत असणारे कार्य नगरसेवकांच्या आणि कार्यकत्र्यांच्या माध्यमातून मतदारसंघात होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. माझ्या वाढदिवसाच्यानिमिŸााने विद्याथ्र्यांचा होत असलेला गौरव, वृक्षारोपणातून पर्यावरणाचा राखला जात असलेला समतोल अशा लोकोपयोगी उपक्रमाच्या आयोजनाबद्दल वासुदेव पाटील आणि सर्व नगरसेवक, सहकारी कार्यकर्ते यांचे कौतुक केले. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकच वज्रमूठ तयार करून त्याचा मुकाबला करण्याचे आवाहन केले. नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये अधिकाधिक दर्जेदार पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी सर्वशिक्षा अभियानामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे म्हणाले.
यावेळी स्थानिक नगरसेवक बाळकृष्ण पाटील, शिक्षण मंडळ उपसभापती राजश्री कातकरी, तालुकाध्यक्ष मोहन म्हात्रे, समाजसेवक दिनेश पारख, बळीराम पाटील, प्रभाग समिती सदस्य रामचंद्र पाटील, गणेश पाटील, लक्ष्मीताई पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका इंद्रायणी चैधरी, शिक्षिका अनिता राऊत, नंदराज चव्हाण, वंदना राऊत, रूपाली गावंड, शांता गौर, वृषाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.