आ. संदीप नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन,

‘ऐरोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू. या मतदारसंघात इतर पक्षांना हेवा वाटेल असे कार्य करूङ्क, असा दुर्दम्य विश्वास राज्याचे अपारंपरिक ऊर्जा खात्याचे मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार संदीप नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज ना. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते झाले. ऐरोलीच्या सेक्टर ६ येथील ब्लॅकस्मिथ टॉवर-१मध्ये आमदार संदीप नाईक यांचे कार्यालय असून नागरिकांना आठवड्यातून दोन दिवस आमदार संदीप नाईक यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना मांडता येणार आहेत. इतर दिवशी हे कार्यालय नागरिकांसाठी खुले राहणार
आहे.

या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सुमारे दीडहजार नागरिकांची उपस्थिती होती. ठाण्याचे खासदार डॉ. संजीव नाईक, महापौर सागर नाईक, उपमहापौर भरत नखाते, स्थायी समितीचे सभापती अनंत सुतार, कामगार नेते अशोक पोहेकर, माजी स्थायी समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, स्थायी समिती सदस्य शिवराम पाटील, ज्येष्ठ नगरसेवक एम.के. मढवी, नगरसेविका विनयाताई मढवी, नगरसेवक महादेव थोरात, शिक्षण मंडळ सदस्य सुधाकर सोनावणे, नगरसेवक तात्या तेली, परिवहन सदस्य उमाकांत नामवाड, रा. यु. काँग्रेसचे शहर अध्यक्ष जयेश कोंडे, सुनील सुतार, नगरसेवक बाळकृष्ण पाटील, नगरसेवक भोलानाथ ठाकूर आदी नगरसेवक, वॉर्ड अध्यक्ष, युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ना. नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना पालकमंत्री ना. नाईक म्हणाले की, नव्याने झालेल्या ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदार संघातील बेलापूर मतदारसंघात सी.बी.डी. येथे पालिका मुख्यालय, पोलीस आयुक्तालय आहे. पक्ष कार्यालयही बेलापूरमध्ये आहेत. मात्र ऐरोलीत नागरिकांना संपर्क साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य असे कार्यालय नव्हते. नागरिकांना थेट जनसंपर्क साधता यावा यासाठी लोकआग्रहास्तव हे कार्यालय उभारण्यात आले आहे. ऐरोली हा मतदारसंघ संपर्काच्या अनुषगांने महत्त्वाचा आहे. ऐरोली मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या कामांना गती देण्याचे काम सुरू असल्याबद्दल ना. नाईक यांनी आनंद व्यक्त केला. २६फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत होणाèया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचायत राज परिषदेला सर्व नगरसेवक, प्रमुख अधिकारी, वॉर्ड अध्यक्ष, विविध समित्यांच्या सदस्यांनी या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन ना. नाईक यांनी यावेळी केले. ५ मार्च रोजी होणाèया ‘जीवन धाराङ्क या कार्यकर्ता मार्गदर्शक शिबीरा विषयीची माहिती यावेळी ना. नाईक यांनी उपस्थितांना दिली.

आ. संदीप नाईक म्हणाले की, आमदारांशी संपर्क साधण्यासाठी बोनकोडे येथील कार्यालयात यावे लागते. बोनकोडे हे दूर असल्याने प्रभागातील नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. या कारणास्तव हे जनसंपर्क कार्यालय ऐरोलीत उभारण्यात आले आहे. ऐरोलीकरांसाठी आगामी दिवसात प्रशस्त नाट्यगृह, पर्यटन स्थळ, दिघा येथील डॅमला पर्यटनातून विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार नाईक म्हणाले.
आठवड्यातून शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत नागरिकांना प्रत्यक्षात संपर्क साधता येणार असल्याने नागरिकांनी आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहनही आमदारांनी यावेळी केले. ऐरोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना थेट घरबसल्या आमदारांशी संपर्क साधता यावा, यासाठी याच कार्यालयातून ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिगङ्क सेवा सुरू करण्याचा मानस आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केला. पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी ऐरोली येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या कार्यालयात ‘जनता दरबारङ्क सुरू करून न्याय द्यावा, अशी मागणी आमदारांनी केली.

ठाण्याचे खासदार डॉ. संजीव नाईक यांनी आमदार संदीप नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उभारणीबद्दल त्यांचे कौतुक करून संपर्क साधून समस्या सोडविण्याचे आवाहन नागरिकांना केले. महापौर सागर नाईक यांनीही आमदारांकडे नागरिकांनी आपल्या समस्या जनसंपर्क कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन केले.

उपस्थित नगरसेवक, नागरिक, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, युवा वर्गानी आमदार संदीप नाईक यांच्यावर शुभेच्छा वर्षाव करून ऐरोलीतील पहिल्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उभारणीबद्दल आनंद व्यक्त केला.