मुंबई-नवी मुंबईला जोडणारा शिवडी ते न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने, जागतिक स्तरावरील अनुभव व क्षमता असलेल्या सल्लागारांच्या नियुक्तीसाठी निविदा मागविल्या असून सदर प्रकल्पाचे काम आॅक्टोबर 2012 पासून सुरू होणे अपेक्षित आहे,अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत लेखी तारांकित प्रश्नोŸारात दिली.

ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक यांनी मुंबई-नवी मुंबई यांना जोडणाÚया 22 कि.मी. लांबीच्या शिवडी ते न्हावा शेवा ट्रान्स हार्बर मार्गाच्या बांधकामाबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता.
हा मार्ग बांधण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात कधी होणार व किती कालावधीत काम पूर्ण होणार, निर्णय झ्ााला नसल्यास विलंबाची कारणे काय, याकडे मुख्यमंत्र्यांचे आ. संदीप नाईक यांनी खुलासा मागविला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील उŸार दिले.

खारघर खाडीमधील नाल्यांचे काँक्रीटीकरण सिडकोच्या विचाराधीन -मुख्यमंत्री

नवी मुंबईतील खारघर परिसरात डोंगरातून वाहत येणारे पाणी खाडीमध्ये निचरा व्हावा यासाठी सिडकोमार्फत नाल्यांची तजवीज करण्यात आली आहे. या नाल्याचे कायमस्वरूपी काँक्रीट, पिचिंग करणे सिडकोच्या विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत लेखी तारांकित प्रश्नोŸारात दिली.

खारघर परिसरात डोंगरातून वाहत येणारे व पुढे खाडीला मिळणारे पाणी टँकर चालकांनी शिव मंदिरासमोरील नाल्यात अडवून त्यात आंघोळ करणे, कपडे धुणे, निर्माल्य टाकणे तसेच सेक्टर 11 मधील मलनिरूस्सारण पाणी सोडणे इत्यादी प्रकार केल्यामुळे हे पाणी पुढे नवी मुंबई व खारघरच्या संपूर्ण परिसरात जाऊन दुर्गंधी पसरलीअसून रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झ्ााला आहे. याकडे आ.संदीप नाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता उŸारात मुख्यमंत्र्यांनी स्थानिक टँकर चालक या नाल्यामध्ये बांध टाकून पाणी अडवितात हे मान्य केले.

मात्र सिडकोमार्फत सदर बांध तोडण्याची कार्यवाही केली जाते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगून रहिवाशांच्या आरोग्याला धोका होऊ नये यासाठी उपाययोजना सिडकोमार्फत करण्यात येतात असा खुलासा केला.