|
ऐरोली विधानसभा मतदारसंघात सुरु असणारी स्कायवॉक उभारणीची कामे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होऊन ती नागरिकांसाठी खुली होतील, असा विश्वास ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांनी आज (ता. ७) स्कायवॉक कामाच्या पाहणी दौèयात व्यक्त केला. स्कायवॉक उभारताना त्यात लाईटची सुविधा, स्कायवॉकवरील अधिकृत जाहिरातीच्या माध्यमातून येणाèया महसुलातून लिफ्टची सुविधा, सुरक्षारक्षक सेवा उभारणे तसेच इतर जुन्या स्कायवॉकवर शेड टाकण्यासंदर्भात आ. संदीप नाईक यांनी अधिकाèयांशी चर्चा केली.
ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार संदीप नाईक यांनी आज नवी मुंबईत ७ ठिकाणी सुरु असलेल्या स्कायवॉकच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, भोलानाथ ठाकूर, राम आशिष यादव, अशोक पाटील, मधुकर बाबू मुकादम, सुरेश कुलकर्णी,अमित मेढकर, सुधाकर सोनावणे, नवीन
|
ेगवते, संदीप घोष जी.एस. पाटील, बिज्रेश qसग, मिलिंद पाटील, मुकेश गायकवाड, माजी नगरसेवक पांडुरंग गोटे, चंद्रकात पाटील, दीपक पाटील (फ प्रभाग समिती सदस्य), हनुमंत दळवी (परिवहन सदस्य), सुरेश सालदर नगरसेवक, शंकर मोरे (ई प्रभाग समिती अध्यक्ष), मुनावर पटेल (ई प्रभाग समिती सदस्य), जयेश कोंडे (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस), अर्जून अढांगळे (क प्रभाग समिती सभापती), शिवाजी जाधव, अशोककुमार qसग, प्रभाग कŸ्र. ६च्या राष्टड्ढवादी काँग्रेसच्या वॉर्ड अध्यक्षा यशोदा मढवी, तालुका प्रमुख पद्मजा केŸणी, पालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल नेरपागर, उपअभियंता संजय पाटील, अभियंता शिरोसे, बांधकाम विभागाचे विशाल शाह, एस.के. बासू (प्रकल्प व्यवस्थापक), एस. जी. बसवराज आदी मान्यवर उपस्थित होते.
ऐरोली विधानसभा मतदार संघातील ठाणे बेलापूर मार्गावरील ऐरोली नाका, दिवा कोळीवाडा चौक, राबाळे रेल्वे स्टेशन परिसर, तळवली-गोठीवली नजीक स्कायवॉक, घणसोली परिसर, खैरणे येथील हायवे मार्गावरील स्कायवॉक, पावणे गावानजीक स्कायवॉक, तुर्भेनाका येथील स्कायवॉक अशा आठ ठिकाणच्या प्रगती पथावर आणि पूर्णत्वास आलेल्या स्कॉयवॉकची आमदार संदीप नाईक यांनी पाहणी केली.
यावेळी माहिती देताना स्थायी समितीचे सदस्य असल्यापासून या ठिकाणी स्कायवॉक उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार संदीप नाईक म्हणाले. या पाहणी दौèयात आमदार संदीप नाईक यांनी उपस्थित नगरसेवक, स्थानिक नागरिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. नागरिक आणि नगरसेवक यांच्याकडून उपस्थि करण्यात आलेल्या सूचनाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी आ. नाईक यांनी अधिकाèयांना दिले.
या स्कायवॉकवरील जाहिरातीच्या माध्यमातून पालिका प्रशासनला अधिका अधिक महसूल कसा मिळेल यासाठी अधिकारी, महापौर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबईत अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता तसेच वाहतूक कोंडी समस्या लक्षात घेता महापे, रबाळे नाका, खैरणे येथे ही फ्लाय ओव्हर ब्रीज उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संदीप नाईक म्हणाले. यावेळी पर्यंत करण्यात आलेल्या कामांची तपशीलवार माहिती उपअभियंता संजय पाटील यांनी आमदार संदीप नाईक यांना दिली. स्कायवॉक उभारण्याबरोबरच या आठही स्कायवॉकमध्ये विद्युत रोषणाई तसेच सुरक्षेविषयक प्रयत्न करणार असल्याचे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले. ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे नाका, पावणे नाका, तुर्भे नाका या परिसरात रेल्वेची सीमा निश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासन तसेच सिडकोशी अधिकाèयांशी आणि काही ठिकाणी स्कायवॉक उभारणीला अडथळा आणणारी ओव्हरहेड वायर हटविण्यासाठी महावितरण विभागाशी चर्चा करणार असल्याचे आमदार नाईक म्हणाले. स्कायवॉकची उभारणी झाल्यानंतर त्याची देखभाल करण्यासाठी पालिकेने विशेष यंत्रणा उभारण्याचे आदेश यावेळी आमदार नाईक यांनी अधिकाèयांना दिले.
आ. संदीप नाईक यांनी स्कायवॉकचा कामाचा आढावा घेतल्यानंतर अधिकाèयांशी चर्चा करून स्कायवॉकची कामे एप्रिलपर्यंत मार्गी लागतील असा विश्वास प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
नवी मुंबईत वाढत्या वाहतूक कोंडीमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच अपघात मुक्त नवी मुंबई करण्यासाठी या स्कायवॉकचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहनही आ. संदीप नाईक यांनी केले.
ऐरोली येथे उभारणार आकर्षकप्रवेशद्वार
जगाच्या नकाशात मेट्रोसिटी म्हणून नवीमुंबईची वेगळी ओळख ओह.मात्र नवी मुंबईत कुठेही प्रवेशद्वार नसल्याने मुंबई, ठाण्यातून प्रवेश करणाèयांना नवी मुंबईत कुठे जायाचे आहे याची माहिती मिळत नाही. यासाठी ऐरोली ब्रीजनजीकसेक्टर ९ ते १४, १५परिसरात भव्य आकर्षक प्रवेशद्वार उभारण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
|
|
|