अध्यक्ष आमदार संदीप नाईक यांच्या कुशल नेतृत्वाखाली अतिशय शिस्तबध्द वातावरणात पार पडले. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत अर्ज स्वीकारण्यात आले तर दुपारी 2 ते 5 या वेळेत दाखल्यांचे वाटप करण्यात आले. विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत साक्षांकनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती. याशिवाय तलाठी पंचनामा आणि सत्य प्रतिज्ञापत्राची सोयही होती. खा.डॉ.संजीव नाईक यांच्यावतीने मीरा-ाईंदर येथे अशाच प्रकारचे दाखले वाटप शिबीर मोठ्या प्रमाणावर रविण्यात येते. दाखले वाटप शिबिराचे आयोजन सामाजिक संघटनांनी हाती घेतल्याने तहसिलदार कार्यालयाला मदतच झाल्याचे जÚहाड यांनी आवर्जून नमूद केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी जÚहाड यांनी शिक्षण संकुलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खास अिनंदन केेले.नागरिकांच्या खास मागणीनुसार एकाच वर्षात दुसÚयांदा हे शिबीर घेण्यात आल्याचे सांगून यामधून नवी मुंबईकरांना मिळणारा आनंद हेच शिक्षण संकुलाचे सुयश असल्याची ावना पालकमंत्र्यांनी मांडली. दाखले वाटप शिबिरांच्या आयोजनाचे सर्व श्रेय पालकमंत्री ना.नाईक यांचे असून नवी मुंबईकरांना अिप्रेत कार्य संकुलाच्या माध्यमातून विविध उपक्रमातून करणार असल्याचे आमदार संदीप नाईक म्हणाले.
महापौर सागर नाईक, कामगार नेते अशोक पोहेकर, महापालिकेतील सागृहनेते विðल मोरे, स्थायी समितीचे सापती रमेश शिंदे, शिक्षण मंडळाच्या उपसापती राजश्री कातकरी, पक्षप्रतोद विनीत पालकर, नगरसेवक सुरज पाटील, नगरसेवक संपत शेवाळे, राजेश ोर,नायब तहसिलदार विशाल दौंडकर, नेरुळ पोलिस ठाण्याचे अधिकारी साळुंखे, राष्ट्रवादीचे आत्माराम गोपे, ज्येष्ठ नगरसेवक अशोक गावडे आदी मान्यवर आजच्या शिबिराप्रसंगी उपस्थित होते.
उपक्रमाचे कौतुक
मोफत दाखले वाटप शिबिरात आलेले नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. हा एक प्रकारचा दक्ष उपक्रम असल्याचे नेरुळ येथे राहणारा सचिन माटेकर हा विद्यार्थी म्हणाला. या शिबिरात एकाच छताखाली सर्व दाखले मिळतात हे शिबिराचे वैशिष्ट्यं असल्याचे मेकॅनिकल शाखेतील या विद्यार्थ्याने सांगितले.
यापूर्वी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आम्ही तीन दिवस ठाण्याला खेटे मारले. परंतु आजच्या शिबिरात केवळ तीन तासात हा दाखला मिळाल्याचा आनंद जुईनगर येथे राहणारे युवराज विचारे व त्यांच्या पत्नीने व्यक्त केला.
माझा कपडे विक्रिचा व्यवसाय आहे. मला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला त्वरित मिळाला, असे शिबीर सहा महिन्यातून एकदा व्हायला पाहिजे अशी सूचना मोहनलाल धरमचंद गौदी यांनी केली.
माझ्या मुलीने सीईटीची परीक्षा दिली उŸाम प्रकारे आहे. दाखल्यासाठी तिला वाशीवरुन ठाण्याला खेपा माराव्या लागल्या तरीही दाखला मिळाला नाही. दाखल्याची ही चिंता नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या आजच्या शिबिरात मिटल्याचे वाशीगाव येथे राहणारे दत्तू अंधाळे यांनी नमूद केले.