वॉर्ड सल्लागार समितीच्या माध्यमातून ना. गणेश नाईक यांनी नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव संकल्पना आज मांडली. एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिर परिसरात जमलेल्या सुमारे १३ हजारांच्या विशाल जनसमुदायासमोर विकासाच्या या नव्या जीवनशैलीची माहिती त्यांनी दिली. खा. डॉ. संजीव नाईक, आ. संदीप नाईक, माजी ज्येष्ठ नगरसेवक ज्ञानेश्वर नाईक, महापौर सागर नाईक, आ. शशिकांत शिंदे, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अनंत सुतार, सभागृहनेते विठ्ठल मोरे, कामगार नेते अशोक पोहेकर आदींसह राष्टड्ढवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि नवी मुंबईतील प्रत्येक भागातून आलेले नागरिक या अविस्मरणीय कार्यक्रमास उपस्थित होते.
नवी मुंबईत अनेक सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रम राबविले. राष्टड्ढवादी काँग्रेसचे अध्यक्ष ना. शरदचंद्र पवार यांना अभिप्रेत सर्वसमावेशक विचार दिल्याचे सांगून महापालिकेत मिळालेली एकहाती सत्ता केवळ नवी मुंबईकरांमुळे मिळाल्याचे ना. नाईक म्हणाले. नगरसेवक च्या कामाचे कौतुक करून सत्ता मिळाली म्हणून हुरळून न जाता सर्व जाती, पंथ, धर्माच्या लोकांना जोडण्याचे काम करा. त्यांना प्रेम आणि आपुलकी द्या, असे आवाहन त्यांनी केले. असे कार्य करणारे खरे नागरिक, कार्यकर्ते आणि नगरसेवक ठरू शकतात, असे मत मांडले. सिडकोने बांधलेल्या निकृष्ट इमारतींमधून हजारो लोक जीव मुठीत घेवून राहत आहेत. या इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. या प्रश्नासाठी आमदार आणि खासदार प्रसंगी रस्त्यावर उतरून या रहिवाशांसाठी संघर्ष कŸरतील, असा इशारा त्यांनी दिला. चांगले आचार आणि विचार ही यशाची गुरुकिल्ली आहे, असा संदेश त्यांनी उपस्थित लोकांना दिला. जनता दरबाराच्या माध्यमातून कित्येक प्रश्न सोडविले आहेत. वॉर्ड सल्लागार समितीचे कार्य सर्वांना बळ देणारे ठरेल. प्रत्येकाने अंगी सद्विचार बानवावे, असा सल्ला देतानाच त्यांनी यावेळी वाल्या कोळी यांच्या गंरथाचा संदर्भ दिला.
वॉर्ड सल्लागार समिती स्थापन केली म्हणजे कर्तव्य पार पाडले असे नसून २२ समित्यांच्या माध्यमातून होणाèया कार्याची माहिती वेळोवेळी घेणार असून योजनांची अंमलबजावणी होते आहे की नाही, याची काटेकोरपणे पाहणी करू, असे ना. नाईक यांनी नमूद केले. ना. शरदचंद्र पवार यांना अभिप्रेत समाज घडविण्याचे कार्य नवी मुंबईचे नगरसेवक करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी जीवनधाराविषयी आपले विचार करताना ना. गणेश नाईक यांनी या संकल्पनेच्या माध्यमातून विकासाची नवी गंगा आणल्याचे सांगितले. पालकमंत्री ना.नाईक यांनी जीवनधारेच्या माध्यमातून नवी जीवनशैली, उत्तुंग विचार आणि तांत्रिक ऊर्जा दिली आहे. त्यांना गुरु श्रेष्ठ मानून हा विचार यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे आणि एक अभिनव गुरुभेट ना. नाईक यांना द्यावी, असे आवाहन केले. अंगी सद्भावना आणि सद्विचार असेल तर गरुड भरारी मारता येते. ना. गणेश नाईक हे केवळ आदेश देणारे नेते नसून प्रत्यक्षात कृती करणारे नेते आहेत, असे सांगून ‘सत्यम् शिवम् आणि सुंदरम्ङ्क असे या जीवनधारेचे स्वरुप आहे. ही संकल्पना नवी मुंबईचा सुखमय आणि तेजोमय भविष्यकालीन विकास घडवेल, अशी खात्री श्री थत्ते यांनी दिली.
२१ व्या शतकातील सुनियोजित बांधणीचे शहर म्हणून नवी मुंबई आधुनिक नागरी सुविधा प्रकल्पांमुळे नावाजली जात असताना नागरिकांना अपेक्षित कामे होऊन आदर्श शहराकडे वाटचाल व्हावी यादृष्टीने पायाभूत अशा वॉर्डस्तरापासूनच नागरी जीवनाशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले जाणे आवश्यक आहे. याकरिता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून ‘‘ नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समिती ङ्कङ्क ही अभिनव संकल्पना साकारली जात आहे. ही संकल्पना म्हणजे ‘‘मायक्रो सोशल इंजिनिअरिंगचेङ्कङ्क प्रत्यक्षदर्शी रुप असून याद्वारे जनतेशी सतत संवादी राहून त्यांच्या प्रतिक्रिया, विचार जाणून घेतले जातील व खèया अर्थाने लोकाभिमुख कार्यप्रणाली अधिक सक्षमतेने व जनतेला अपेक्षित पध्दतीने राबविण्यात येईल.
या संकल्पनेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ८९ वॉर्डांमध्ये नागरी जनजीवनाशी संबंधित - रस्ते गटारे व फुटपाथ, गार्डन मार्केट व आयलँड, पथदिवे व विद्युतीकरण, अतिक्रमण व जाहिरात, आरोग्य व स्वच्छता, महिला व बालकल्याण, विधी व न्याय, महसूल वाढ, सामाजिक व आदिवासी विकास, पर्यावरण व वनीकरण, वाहतूक, शिक्षण, पाणीपुरवठा व मलनि:स्सारण, झोपडपट्टी पुनर्वसन व सुधारणा, वित्त लेखापरीक्षण व दक्षता, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक, रोजगार व्यापार व उद्योग, अन्नधान्य पुरवठा (रेशqनग), फेरीवाला, सहकार अशा २२ विविध विषयांच्या समित्या कार्यरत असणार आहेत. प्रत्येक वॉर्डात २२ वेगवेगळ्या विषयांच्या समित्यांमध्ये प्रत्येक वॉर्ड सल्लागार समिती ही अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि तीन सदस्य अशा सहा व्यक्तींची असणार असून ८९ वॉर्डस्च्या १९५८ वॉर्ड सल्लागार समित्यांमधून एकूण ११,७४८ सदस्य नवी मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द असणार आहेत. हे सदस्य आपल्या वॉर्डस्मधील नगरसेवक आणि पक्ष पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या विषयास अनुरुप काम करणार आहेत.
ेया वॉर्डनिहाय २२ विषयांच्या वॉर्ड सल्लागार समित्या संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरील केंद्रीय समितीकडे अर्थात नवी मुंबई सल्लागार परिषदेकडे समितीच्या मुख्य समन्वयकांच्या मार्फत आपली निरीक्षणे, अभिप्राय, सूचना यांचा अहवाल दर महिन्याला सादर करतील. नवी मुंबईमधील अनुभवी व नामवंत डॉक्टर्स, वकील, वास्तुविशारद, शिक्षणतज्ज्ञ, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, पत्रकार, व्यापारी, खेळाडू, कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा नवी मुंबई परिषदेत समावेश असेल.
प्रत्येक वॉर्डचे स्वरुप वेगवेगळे असते. सामाजिक गरजा निरनिराळ्या असतात. त्यामुळे त्या-त्या ठिकाणचे संदर्भ लक्षात घेऊन वेगवेगळ्या स्वरुपाचे काम करावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेऊन वॉर्डमधील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणाèया व त्यांना सहज उपलब्ध होणाèया यंत्रणेची शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यकता भासते. स्थानिक पातळीवर सामाजिक कार्य करणाèया व्यक्तींकडूनच आपला वॉर्ड येथील नागरिकांना हवा तसा घडवण्यासाठी त्यांचाच मदतीने काम करणे हे वॉर्ड सल्लागार समितीचे नेमके उद्दिष्ट असणार आहे.
या संकल्पनेमागील ध्येय व उद्दिष्टांची माहिती देण्यासाठी आज एम. आय. डी. सी. तील श्री बावखळेश्वर मंदिराजवळील पटांगणात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित महापालिका नगरसेवक, नगरसेविका, पक्षपदाधिकारी, सर्व वॉर्ड सल्लागार समित्यांचे सदस्य अशा १३ हजारहून अधिक उपस्थितांना समित्यांच्या कार्यप्रणालीची माहिती देणारी ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. या शिवाय पृथ्वीच्या उत्पत्तीपासून जीवसृष्टीचा उदय, मानवाचा इतिहास, उत्क्रांती, प्रगती याचा आढावा घेत भारताचा इतिहास दाखविणाèया माहिती पटातून अंतिमत: मानवता धर्म आणि सामाजिक दृष्टिकोन हेच अंतिम सत्य आहे, असा संदेश प्रसारीत करुन या वॉर्ड सल्लागार समितीचा उद्देश स्पष्ट करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित सर्व वॉर्ड समिती सल्लागार समिती पदाधिकारी व सदस्य यांना त्यांची छायाचित्रे व कौटुंबिक माहिती असणारी ओळखपत्रे देण्यात आली. त्याचप्रमाणे ना.श्री.गणेश नाईक यांची सर्वसमावेशक विचारधारा मांडणारे ‘‘जीवनधाराङ्कङ्क हे पुस्तक सर्व उपस्थितांना देण्यात आले. प्रत्येक सामाजिक कार्यकत्र्याला मार्गदर्शक ठरेल आणि कार्यप्रणव बनवले अशा स्वरूपाचे ना.श्री.गणेश नाईक यांच्या भाषण-संभाषणातील विचार सुविचारांचे संकलन खèया अर्थाने वैचारिक ‘‘जीवनधाराङ्कङ्क आहे.
भव्य पटांगणात प्रत्येक सल्लागार समितीची वॉर्डनिहाय बैठकरचना, त्यांना ५ भव्य स्क्रीन्सद्वारे माहितीपटांचे प्रक्षेपण, तेरा हजारातून अधिक व्यक्तींची उपस्थिती असूनही कोणत्याही प्रकारची गडबड-गोंधळ न होता. सुव्यवस्थित पद्धतीने आयोजन या सगळ्या गोष्टींमधून कार्यक्रमाची भव्यता प्रदर्शित होत होती.
ना.श्री.गणेश नाईक यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधल्यानंतर व्यासपीठावरून खाली उत्तरून सर्वांसह माहितीपट बघितला. या माहितीपटाच्या व कार्यक्रमाच्या सीडीज् देखील सर्व वॉर्ड सल्लागार समिती सदस्यांना वितरीत करण्यात येणार आहेत.
या समित्यांच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाच्या अपेक्षा थेट आपल्यापर्यंत पोहोचू शकतील व त्यामधून आदर्श शहराच्या संकल्पपूर्तीकडे सकारात्मक वाटचाल करणे सुलभ होईल, असा विश्वास ना. श्री. गणेश नाईक यांनी व्यक्त केला.