नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या माध्यमातून मराठी, इंग्रजी माध्यमातील इयत्ता १० वीच्या विद्याथ्र्यांसाठी तीन वर्षांपासून यशस्वीपणे सराव परीक्षचे आयोजन करण्यात येत आहे. या सराव परीक्षेत गतवर्षी पहिला आलेला विद्यार्थी हा बोर्डात झळकला होता. नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या या उपक्रमामुळे विद्याथ्र्यांच्या मनातील दडपण दूर होऊन आत्मविश्वास बरोबर गुणवत्ता ही वाढली, ही स्वागतार्ह बाब असल्याचे प्रतिपादन ऐरोली विधानसभा मतदार संघाचे युवा आमदार तथा नवीमुंबई शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संदीप नाईक यांनी सराव परीक्षेच्या उद्घाटन कार्यक्रमात आज केले. पुढच्या वर्षापासून qहदी माध्यमातून ही सराव परीक्षा घेण्याचा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबई शिक्षण संकुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चौथ्या एसएससी सराव परीक्षेचे उद्घाटन आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते ऐरोली येथील राधिकाबाई मेघे महाविद्यालयात
आले. नवी मुंबईतील विविध ठिकाणी २० केंद्रावर एकाच वेळेस ही परीक्षा सुरू झाली आहे.


या कार्यक्रमाची सुरूवात विद्येची देवता सरस्वती यांच्या पूजनाने तसेच मेघे विद्यालयातील विद्यार्थिनींच्या ‘सब मिलकर करते है, स्वागत आज तुम्हाराङ्क या स्वागत गीताने झाली. आ.संदीप नाईक यांचे शिक्षण संकुलाच्यावतीने स्थायी समितीचे सभापती अनंत सुतार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

उद्घाटनपर भाषणात आमदार संदीप नाईक यांनी प्रथम या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे, पदाधिकाèयांचे आणि परीक्षकांचे आभार मानले. उपस्थित विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ना. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली अखंडीत तीन वर्षापासून सुरू असणाèया या सराव परीक्षेचे यंदाचे ४ थे वर्ष आहे. या सराव परीक्षेत सहभागी होणाèया विद्याथ्र्यांच्या मनात तसेच कार्यकत्र्यांमध्ये असणारी उत्सुकता आनंददायी आहे. शालांत परीक्षेला सामोरे जाणाèया विद्याथ्र्यांच्या बरोबर त्यांच्या पालकांमध्ये असणारी qचता दूर करण्यास ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची ठरते आहे. मागील वर्षी दहावीच्या परीक्षेला १४ लाख ३९हजार १८० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२ लाख ३ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २ लाख ३५हजार ७१६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाèयांची टक्केवारी ८३.६२ इतकी असून अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण १६.३८ टक्के इतके आहे. जागतिक स्तरावर भारताचा साक्षरतेच्या बाबतीत १४९ वा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा देशात साक्षरतेच्याबाबतीत ५ वा क्रमांक असून यापाश्र्वभूमीवर साक्षरतेच्या बाबतीत नवी मुंबई अग्रक्रमावर असल्याचा गौरवोपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

दहावीची परीक्षा हा आयुष्याला कलाटणी देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. इ. १ ते ९ वी पर्यंत शिक्षण घेताना परीक्षेसाठी एकच शाळा, तसेच शिक्षक, शिपाई, वातावरण सारखेच असते. मात्र १०वीच्या परीक्षेला नवी शाळा, नवे वातावरण, शिक्षक असल्याने विद्याथ्र्यांवर दडपण असते. या दडपणातून बाहेर पडून तुमचा आत्मविश्वास वाढावा, गुणांमध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येत असल्याचे आ. संदीप नाईक म्हणाले. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारी सधन घरातील मुले क्लासेस लावतात. परंतु मध्यमवर्गीय आणि पालिका शाळातील विद्यार्थी क्लास लावू शकत नाही. त्या दृष्टीकोनातून ही सराव परीक्षा आजवर उपयुक्त ठरल्याचे संदीप नाईक यांनी विद्याथ्र्यांना आवर्जून सांगितले. गतवर्षी असणारा ८ हजाराचा टप्पा आता १० हजाराहून पुढे गेल्याचे त्यांनी नमूद केले.

सर्वसाधारणपणे इतर महानगरपालिकेच्या शाळातील विद्यार्थी ६८ टक्क्यांपर्यंत गुण मिळवितात जातात. परंतु नवी मुंबई महापालिकेचे विद्यार्थी हे ९६ टक्क्यांपर्यंत मजल मारतात. शालेय शिक्षण आणि सांघिक खेळात सराव हा महत्त्वाचा असून सरावातून आत्मविश्वास, आत्मविश्वासातून निर्माण होणारी जिद्द आणि साहस हेच विद्याथ्र्याला यश मिळवून देत असतात. विद्याथ्र्यांना सराव परीक्षेतील चुका सुधारून आणखी अभ्यास करून बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळविण्याचे आवाहन केले.

उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना संदीप नाईक म्हणाले की, ठाणे-बेलापूर पट्टयाची औद्योगिक जगतात वेगळी ओळख आहे. परंतु केवळ शिक्षण घेतल्याने रोजगाराची संधी उपलब्ध होते असे नाही. त्याकरिता रोजगार प्रशिक्षणही अत्यावश्यक आहे. ऐरोली आणि बेलापूर मतदार संघात आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची मागणी विधानसभा सभागृहात केली आहे. आणि ती पूर्ण व्हावी यासाठी पाठपुरावा करणार आहे.