आ. संदीप नाईक यांची मागणी मान्य
नवी मुंबईतील ऐरोली पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन त्या ठिकाणी आणखी एक नवे पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच तुर्भे एमआयडीसी येथे नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची घोषणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज विधानसभेत केली
.
नवी मुंबईतील वाढते गुन्हे पाहता या ठिकाणी नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी ऐरोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या मागणीवरून ही नवीन पोलीस ठाणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे.
नवी मुंबईतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत पोलीस ठाणी आणि पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये चोèया, दरोडे, घरफोड्या, सोनसाखळी चोरणे, खून, असे अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीची भावना आहे. ऐरोली आणि तुर्भे एमआयडीसी या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे निर्माण करावे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या वाढवावी अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली होती. ती मान्य करण्यात आली. तुर्भे एमआयडीसी येथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे असून नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीमुळे येथील चोèयांना आळा बसणार आहे. या पोलीस ठाण्यामुळे एमआयडीसीच्या हद्दीत घडणाèया गुन्हयांची नोंद करण्यासाठी तक्रारदारांना रबाळे qकवा तुर्भे येथे जाण्याची गरज भासणार नाही. एमआयडीसीचा अर्धा भाग तुर्भे आणि अर्धा भाग रबाले पोलीस ठाण्यात विभागला गेला होता. आता एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे तयार होणार असून त्यामुळे गुन्ह्यांची उकल जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने आहेत. तरी देखील या भागात दरोडा पडण्याची घटना घडली आहे. देशात महत्त्वाच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करीत आहेत. त्याचा उलगडा सीसीटीव्ही कॅमेèयांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या इमारती आणि प्रमुख केंद्रे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत qशदे यांनी केली.
राज्यात ४४ हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. आणखी ११ हजार अतिरिक्त पोलिसांची भरती करण्यात येणार असून या भरतीमधून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी जादा पोलीस देण्यात येतील, असे आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिले.
ऐरोली पोलीस ठाण्याचे विभाजन करून त्या ठिकाणी आणखी एक पोलीस ठाणे तसेच तुर्भे येथे एक नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून येथील गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दल वाढविले जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.