नवी मुंबईतील नेरूळ आणि इतर ठिकाणी बसस्थानके उभे करण्यासाठी लागणाèया जागांचे सव्र्हेक्षण करण्यात आले असून त्याचा सव्र्हेक्षण अहवाल येत्या १५ ते २० दिवसांच्या आत येणार आहे. त्यानंतर भूखंड उपलब्ध करून बसस्थानक उभे करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली. ऐरोली मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांनी या विषयीचा प्रश्न उपस्थित केला होता.

नवी मुंबईतील सेक्टर ३२ नेरूळ येथे एसटीचे बसस्थानक बांधावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात एसटीच्या बसगाड्या येत-जात असतात. परंतु येथे असणाèया बसस्थानकांमधून एसटीच्या बसेस सोडण्यात येत नाही. नवी मुंबईतून रोज शेकडो प्रवासी बाहेरगावी एसटी बसने प्रवास करतात. मात्र या ठिकाणी एसटीचे बसस्थानक नसल्याने लाखो प्रवाशांची गैरसोय होत आहे. नवी मुंबई हे बाहेरगावी ये-जा करण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. नेरूळ हे मध्यवर्ती ठिकाण असून येथे एसटीचे बसस्थानक शासन केव्हा बांधून देणार आहे त्याबाबतची शासनाची भूमिका जाहीर करावी, अशी मागणी प्रश्नोत्तराच्या तासात केली होती.

नवी मुंबईतील बसस्थानकांसाठी जागांचे सव्र्हेक्षण करण्यात आले आहे. हे जरी खरे असले तरी बसस्थानके बांधण्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देत नाही. एका वर्षात नवी मुंबईत एसटीचे किती बसथांबे बांधण्यात येणार आहेत. हे स्पष्ट करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत qशदे यांनी या प्रश्नावर झालेल्या चर्चेत भाग घेताना केली.