सुरु करण्यात आलेला चित्रकलाकक्ष हा सुसज्ज असून त्यामध्ये चित्रकलाविषयक सर्व साहित्य उपलब्ध आहे. युवा नगरसेविका डॉ.गौतमी सोनावणे यांच्या संकल्पनेतून हा कक्ष साकारला आहे.
राजश्री शाहू महाराज विद्यालयाच्या स्थापनेत मोलाची भुमिका बजाविणारे माजी नगरसेवक आणि महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे विद्यमान सदस्य सुधाकर सोनावणे यांनी प्रास्ताविक केले. दोन वर्गापासून ही शाळा सुरु केली होती आता या शाळेता. सुमारे ३हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करीत असल्याचे ते म्हणाले. ज्ञानदान हे पैशांपेक्षाही महत्वाचे असून आयुष्यभर ते आपल्याला साथ देते, असे मत त्यांनी मांडले. पालकमंत्री नामदार गणेश नाईक, खासदार डॉ.संजीव नाईक, आमदार संदीप नाईक आणि महापौर सागर नाईक यांचे शाळेच्या कार्यात नेहमीच सहकार्य लाभते, असा कृतज्ञतापूर्ण उल्लेख त्यांनी केल .
राजश्री शाहू महाराज विद्यालयातील गुलाब बागेला आमदार संदीप नाईक यांनी कार्यक्रमप्रसंगी भेट दिली. सुमारे एक हजार विविध जातींच्या गुलाबाची फुले या बागेत पहावयास मिळतात. या बागेत मन प्रसन्न होते आणि एक नवा तजेला निर्माण होतो, आमदार नाईक या भेटीप्रसंगी म्हणाले. ऑक्सीझन झोन या उपक्रमाअंतर्गत शाळेने सुमारे साडेतीन हजार तुळशीची रोपे लावली आहेत. याशिवाय आयुर्वेदिक वनस्पतींची मोठया प्रमाणावर शाळेच्या आवारात लागवड करण्यात आली आहे. शाळेच्या प्रत्येक वर्गात सीसीटिव्ही कॅमेरे असून स्वतंत्र ध्वनीयंत्रणा आहे. शाळेत सुसज्ज प्रयोगशाळा आहे. महापालिकांच्या पारंपारिक शाळा संकल्पनेला छेद देत नवी मुंबई महापालिकेच्या या शाळेने एक नवा आदर्श समोर ठेवला असल्याचे कौतुकोद्गार आमदार संदीप नाईक यांनी काढले. कार्यक्रमास महापालिकेच्या इ प्रभाग समितीच्या अध्यक्षा रंजना सोनावणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.