ग्रीन होप संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबई शहरात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षरोपणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. येत्या वर्षभरात 1 लाख झ्ााडे लावण्याबरोबरच सन 2015 पर्यंत संपूर्ण नवी मुंबई ;हरितद्ध ग्रीन सीटी करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रीन होपचे अध्यक्ष आ.संदीप नाईक यांनी ऐरोली येथे दिली.

ग्रीन होप संस्थेच्यावतीने आज ऐरोली सेक्टर 10 परिसरात वृक्षरोपण तसेच मोफत वृक्षरोपे वाटपाच्या विभागवार पहिल्या टप्प्याच्या शुभारंभ आ. नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
आ. नाईक यांच्या हस्ते प्रथमतरू गुलमोहर, अशोक जातीच्या रोपट्याचे रोपण करण्यात आले. त्यानंतर स्थानिक नगरसेवक, नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समितीच्या पर्यावरण आणि वनीकरण समितीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिकांनीही वृक्षरोपण केले.


यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. नाईक म्हणाले की, 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते ’ग्रीन मिशन-2011‘ च्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी 1 लाख वृक्षांचे रोपण करण्याचा मनोदय ना. नाईक यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार शहरातील प्रत्येक नोडमध्ये वृक्षरोपण करण्यात येत आहे. ग्रीन होप केवळ वृक्षरोपण करणार नसून वृक्षांचे संवर्धन करणार आहे.

ग्रीन होप संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाÚया सामाजिक संस्थांना तसेच छायाचित्रण स्पर्धा, लेखन, चित्रकला, स्पर्धातील कर्तबगारांना गौरविण्यात येणार आहे. ग्रीन होपचे कार्य यापुढे वृक्षरोपण इतपतच न राहता येत्या काही महिन्यात जलपर्यटन, आकाशदर्शन, पक्षी निरीक्षण, पर्यावरण मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. शहरातील प्रत्येक नागरिकांना पर्यटनाची, पर्यावरणाची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक वॉर्डातून सहलीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आ.नाईक म्हणाले.

नवी मुंबई शहरातील औद्योगिक पट्ट्यात ग्रीन होपने पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाची मोहिम हाती घेतल्याचे सांगत विविध कंपन्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आ.संदीप नाईक यांनी सर्वांचे कौतुक केले. संस्थेच्या माध्यमातून येत्या 2015 पर्यंत संपूर्ण नवी मुंबईत वृक्षरोपण करून नवी मुंबई शहराला ’ग्रीन सीटी‘ म्हणून नवी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संस्थेच्यावतीने प्रत्येक नोड मध्ये मोफत वृक्षरोपे वाटप केंद्रे उभारण्यात येणार असून याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आ.नाईक यांनी यावेळी केले.

यावेळी नगरसेवक अशोक पाटील, बाळकृष्ण पाटील, भोलानाथ ठाकूर, एम. के. मढवी, तसेच शिक्षण सदस्य वासुदेव पाटील, परिवहन सदस्य उमाकांत नामवाड, रा.कॉ. पार्टीचे जि. सदस्य जी.एस.पाटील, राष्ट्रवादी युवकचे शहर अध्यक्ष जयेश कोंडे आणि वृक्ष समितीचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.