’पर्यावरणाचा समतोल राखू, शुद्ध हवा पाणी चाखू‘
’वृक्ष ज्याच्या दारी, ऑक्सिजन त्याच्या घरी‘
’जिथे नवी मुंबई, तिथे पर्यावरण स्नेही‘

असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईत ’ग्रीन होप‘ या सामाजिक संस्थेच्यावतीने घणसोली आणि सीबीडी परिसरात ’ग्रीन मिशन-2011‘ मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नवी मुंबई शहरात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वर्षभरात 1 लाख वृक्षांची लागवड करून मेट्रो सिटी असलेल्या नवी मुंबईला ’ग्रीन सिटी‘चा नावलौकिक मिळवून देण्यासाठी भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न करू, अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिली.
.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रीन होप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ. संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घणसोली येथील घरोंदा मैदान सेक्टर 9 आणि सीबीडी-बेलापूर सेक्टर 15 मधील जागिंग ट्रकलगत वृक्षारोपण करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या हस्ते ’ग्रीन मिशन-2011‘ चा शुभारंभ झ्ााला. यावेळी खा. डॉ. संजीव नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रमेश शिंदे, नवी मुंबईतील नगरसेवक,नगरसेविका विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, विविध धर्मीय, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री ना. नाईक यांनी स्वतरू वृक्षारोपण केल्यानंतर नगरसेवक, नवी मुंबई सल्लागार समितीच्या पर्यावरण आणि वनीकरण वॉर्ड सल्लागार समितीचे सदस्य, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या हस्ते सुमारे 250 पेक्षा अधिक वृक्षरोपे लावण्यात आली. पर्यादिनाच्यानिमिŸााने मार्गदर्शन करताना पालकमंत्री ना. नाईक म्हणाले की, ग्रीन होप संस्थेच्यावतीने मागील 3 ते 4 वर्षापासून नवी मुंबईत वृक्षारोपण करण्यात येत आहे. केवळ वृक्षारोपण करण्याचा संकल्प या संस्थेचा नसून त्याचे जतन करणे हा मूळ उद्देश असल्याबद्दल त्यांनी संस्थेच्या अध्यक्षांचे, पदाधिकाÚयांचे कौतुक केले. नागरिकांनी ग्रीन होपच्या माध्यमातून मागील तीन वर्षे लाखोंच्या संख्येने वृक्षारोपण केले आहे. यंदाही 1 लाख वृक्षांचे रोपण संस्थेच्यावतीने करण्यात येणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सहकार्य करणाÚया व्यक्ती आणि सामाजिक उपक्रमातून नवी मुंबईला हरित ठेवण्यासाठी सहकार्य करणाÚया संस्था यांचा ’जीवन धारा‘संस्थेच्या माध्यमातून गौरविण्यात येणार असल्याचे ना. नाईक म्हणाले. वृक्षांची लागवड केल्यानंतर त्या वृक्षांची जोपासना करण्याचे सामाजिक कर्तव्य नागरिकंनी पार पाडावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. भविष्यात नवी मुंबईला ग्लोबल वॉर्मिगचा धोका होऊ नये या दृष्टीने सीबीडी-महापे, पा रसिक बंदर या डोंगराळ भागात वनखाते, महापालिका यांच्याशी चर्चा करून ग्रीन ट्रगल उभारण्याचा प्रयत्न असल्याचे ना. नाईक म्हणाले.

ग्रीन होप संस्थेचे अध्यक्ष आ. संदीप नाईक सांगितले की, सन 2008 ते 2010 या कालावधीत संस्थेने 3 लाखांहून अधिक झ्ााडे शहरात लावली आहेत. वृक्षारोपणाबरोबर पालकमंत्री ना. नाईक यांच्या संकल्पनेतून शहरात स्वच्छता अभियान राबविले. पर्यावरणावर आधारित चित्रकला स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा, लेखन, चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. येत्या तीन महिन्यात ग्रीन मिशन राबविण्यात येणार आहे. यंदा जलपर्यटन, आकाशदर्शन, पक्षी निरीक्षण, पर्यावरण मार्गदर्शन आदी उपक्रम वर्षभर ग्रीन होप राबविणार असल्याचे आ. नाईक म्हणाले. मागील वर्षी वृक्षारोपणात उल्लेखनीय कार्य करणाÚया व्यक्ती आणि संस्थांना यावर्षी पारितोषिके देवून गौरविण्यात येणार आहे. यावर्षी देखील उत्कृष्ट कार्य करणाÚया संस्था आणि व्यक्तींचा पारितोषिके देऊन संस्था सन्मान करणार आहे. नवी मुंबईत मोठा औद्योगिक पट्टा आहे. या भागात भविष्यातील प्रदूषण लक्षात घेऊन ना. गणेश नाईक यांनी सर्वात आधी वृक्षारोपणाची मोहीम दूरदृष्टीने येथे हाती घेतली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ग्रीन होप संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेच्यावतीने वृक्षारोपणाची मोहीम सुरू राहणार आहे. औद्योगिक विकास आवश्यक आहे. मात्र पर्यावरण संवर्धन काळाजी गरज आहे, असे आ. संदीप नाईक म्हणाले.

खा. डॉ. नाईक यांनी वृक्षारोपण आणि पर्यावरण जतन, संरक्षक ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ग्रीन होपच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबई तीन महिन्यात हरित नवी मुंबई होणार आहे. हा उपक्रम यापुढे राज्यभर राबविण्याचा मानस खा. डॉ. नाईक यांनी व्यक्त करत ग्रीन होपला शुभेच्छा दिल्या.

भविष्यात भेडसाविणारा ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्षात घेता ग्रीन होपने आतापासून वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन मोहिम राबवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केलेली सुरूवात चांगली असून नागरिकांनी तिला सहकार्य करण्याचे आवाहन महापौर सागर नाईक यांनी केले.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रीन होपतर्फे घणसोली आणि सीबीडी या दोन्ही ठिकाणी वृक्षरोपे वाटप केंद्र उघडण्यात आली होती. त्यामधून नागरिकांनी मोठ्या संख्येने वृक्षरोपे नेऊन आपआपल्या परिसरात वृक्षारोपण केले.