यावेळी प्रकल्पग्रस्तांच्यामार्फत त्यांच्यासम¨र आलेल्या अनेक समस्या मार्गी लावण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी सिडक¨ला दिले ह¨ते. त्यावर कितपत कार्यवाही झाली याचा आढावा घेण्यासाठी आजची ही बैठक घेण्यात आली ह¨ती. या भेटीदरम्यान विविध गावठाण क्षेत्रातील व्यक्तींचे शिमंडळही आमदार नाईक यांच्यास¨बत उपस्थित ह¨ते. जयवंत सुतार, पुरूष¨Ÿाम भ¨ईर आदी मान्यवर देखील बैठकीला हजर ह¨ते.
सिडक¨ अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या बैठकीत आमदार नाईक यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या प्रकाशझ¨तात आणल्या. तसेच त्यावर सिडक¨ने वेळीच त¨डगा काढावा, अशी सूचनाही क¢ली. गावठाणा लगतचे म¨कळे भूखंड हे उद्य¨जकांच्या घशात जाऊ देता न देता मैदानांसाठी ते राखीव ठेवावेत. नवी मुंबईतील विविध प्रभाग समित्यांच्या परिसरात क्रीडा संस्कृतीचा म¨ठा वारसा लाभला आहे. मुले, तरुण आणि वयाची 40 वर्षे ओलांडलेल्या व्यक्तीही खेळात प्रविण्य मिळवत आहेत. त्यातूनच ‘40 प्लस’ ही संकल्पना साकारून पालिका क्षेत्रात 24 संघ तयार झाले आहेत. मात्र गावठाणा लगत खेळाचे मैदान नसल्याने सर्वांचीच गैरस¨य ह¨त असल्याची खंत आमदार नाईक यांनी व्यक्त क¢ली. तळवली, ग¨ठीवली, क¨परखैरणे, ब¨नक¨डे, वाशी, सानपाडा, नेरुळ, करावे, दारावे, बेलापूर आद गावांतील रहिवाशांची खेळाचे मैदान उपलब्द करुन देण्याची मागणी आहे.
प्रकल्पग्रस्तांनी गावठाण क्षेत्रात गरजेप¨टी घरे बांधली आहेत. काळाच्या ओघात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढली. सध्याची घरे अपुरी पडू लागली आहेत त्यामुळे घरांचा म¨ठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर पर्याय म्हणून सिडक¨ने प्रकल्पग्रस्तांसाठी गृहप्रकल्प राबवावा, अशी मागणी आमदार नाईक यांनी क¢ली. क¢वळ विशि घटकाला त्यात समावि करून न घेता सर्व स्तरातील प्रकल्पग्रस्तांना या य¨जनेचा लाभ मिळावा, असे ते म्हणाले.
ऐर¨ली मतदार संघात ओव्हरहेड विद्युत वाहिन्यांची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. ओव्हरहेड वायरखालील जागांवर खाजगीत शेती ह¨त असून त्यासाठी दूषित पाणी वापरले जाते. नागरिकांच्या आर¨ग्याच्या .ीने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सिडक¨ने असे भूखंड पालिक¢कडे हस्तांतरीत करावेत, पालिका त्या ठिकाणी सुसज्ज उद्याने तयार करेल. अशी संकल्पना ेत्यांनी यावेळी मांडली.
नवी मुंबईतील कलाप्रेमींची कला ज¨पासण्यासाठी ऐर¨ली येथे नाटयगृह उभारण्यासाठी श्री नाईक प्रयत्नशील आहेत. त्याकरीता सिडक¨ने जागा उपलब्ध करुन ेदण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी क¢ली असता अध्यक्ष हिंदूराव यांनी तात्काळ त्यास हिरवा कंदील देत लवकरच जागा निश्चित क¢ली जाईल, असे सांगितले.
नवी मुंबईतील गावठाणांचा विस्तार झाला असून त्यांच्या पुर्नविकासाठी 4 एफएसआय मंजुर करावा. सिडक¨ने बांधलेल्या आणि आता ध¨कादायक बनलेल्या इमारतींमध्ये छत पडण्याच्या दुर्घटना सुरुच आहेत. एखादी म¨ठी दुर्घटना ह¨वून जिवीतहानी ह¨ण्यापूर्वी या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआय देण्याची मागणी क¢ली. सिडक¨न गावठाणांमधील घरांचे सर्वेक्षण सुरु क¢ले असून त्या घरांना न¨टीसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई आरंभली आहे. या कारवाईविर¨धात प्रकल्पग्रस्तांमध्ये कमालीचा असंत¨ष असल्याचे आमदारांनी निदर्शनास आणून दिले. ही कारवाई तात्काळ थांबविण्याची मागणी क¢ली.
प्रकल्पग्रस्तांच्याम मागण्या मंजुर करण्यासाठी पालकमंत्री नामदार गणेश नाईक सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहेेत. यासंदर्भात त्यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यास¨बत बैठक झाली. सिडक¨च्या म¨डकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआय मंजुर करणेबाबत 23सप्टेंबर 2011र¨जी बैठक झाली ह¨ती. याविषयी सिडक¨ आणि नवी मुंबई महापालिक¢ने स्वतःच्या मतासह एकत्रित अहवाल द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री मह¨दयांनी दिले ह¨ते. त्या अनुशंगाने सिडक¨ने आपला अहवाल तत्परतेने सादर करावा आणि अडीच एफएसआयसाठी मुख्यमंत्री मह¨दयांनी विनंती करावी, अशी सुचना श्री नाईक यांनी क¢ली. या इमारतींमध्ये छत क¨सळण्याच्या दुर्घटना सुरुच असून म¨ठी दुर्घटना ह¨वून जिवीतहानी ह¨ण्याअग¨दर याविषयी निर्णय घेण्याची मागणी त्यांनी क¢ली.
सिडक¨ महामंडळाकडे उपलब्ध असलेले सुविधा भुखंडांचे तातडीने महापालिक¢कडे हस्तांतरण करावे, जणेकरुन नागरिकांना सार्वजनिक सुविधांसाठी त्याचा लाभ देता येईल, असेही त्यांनी नमूद करावे. सिडक¨च्या अखत्यरित असलेला घनस¨ली न¨ड महापालिक¢कडे हस्तांतरित करावा जेणेकरुन या न¨डमधील रहिवाशांना चांगल्या सुविधा देता येतील. प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना प्राधान्याने भुखंडाचे वाटप सवलतीच्या दरात करावे. बीएमटीसी कामगारांच्या कुटुंबातील एकाला सिडक¨त र¨जगार उपलब्ध करुन द्यावा. प्रकल्पग्रस्त शेतकÚयांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सिडक¨ने उचलावा आदी इतर महत्वाच्या मागण्या बैठकीत करण्यात आल्या. ठाणे -वाशी रेल्वे प्रकल्पग्रस्तांना पर्यायी घरे आणि दुकाने देण्याची मागणी क¢ली असता आमदारांच्या सूचनेनुसार सिडक¨ने सकारात्मक पाऊल उचलत त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार नाईक यांनी क¢लेल्या पाठपुराव्यामुळे ऐर¨ली मतदारसंघात स्वतंत्र शिधावाटप कार्यालय उघडण्यास शासनाने मंजुरी दिली आहे त्याकरीता सिडक¨ने जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी श्री नाईक यांनी क¢ली.
प्रकल्पग्रस्त तसेच इतर समस्यांविषयी आमदार नाईक यांनी शासन स्तरावर, सिडक¨ तसेच पालिका स्तरावर पत्रव्यवहार क¢ला आहे. बैठका घेतल्या आहेत. पाठपुरावा क¢ला आहे मात्र या बाबत शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने अद्याप हे विषय मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी सिडक¨ने सर्व संबधीत विभागांची संयुक्त बैठक आय¨जित करावी, अशी सूचना आमदार मह¨दयांनी क¢ल्यानंतर याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री हिंदूराव यांनी दिले.
|