हायटेक सिटी स्कॅन,एमआरआय उपकरणे
लवकरच वाशीच्या प्रथम संदर्भ रूग्णालयात

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रूग्णालयाला ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे युवा आ. संदीप नाईक यांनी भेट देऊन आज येथील आरोग्यविषयक सोयीसुविधांचा आढावा घेतला. डायलिसिस मशीनची संख्या वाढविणे, सिटी स्कॅन मशीन तसेच एमआरआय आदी उपकरणे महापौर व आयुक्तांशी चर्चा करून लवकरच रूग्णालयाच्या सेवेत दाखल करण्यात येतील,अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. थॅलेसिमिया डे केअर युनिटचे उद्घाटन आ.नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या प्रयत्नामुळे पालिकेने सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प दरात उपचार घेता यावा, यासाठी स्वतरूचे प्रशस्त रूग्णालय वाशी येथे उभारले. खाजगी रूग्णालयापेक्षा चांगल्या दर्जाची सेवा येथे रूग्णांना दिली जाते. आ.संदीप नाईक स्थायी समिती सभापती असल्यापासून रूग्णालयाला अधिकाधिक सुविधांनी दर्जा युक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमदार झ्ााल्यानंतरही त्यांनी रूग्णालयाची पाहणी केली होती. त्यावेळी सूचित केलेल्या कामाचा तसेच सध्या आवश्यक असणाÚया सोयी सुविधांचा आढावा त्यांनी आजच्या विशेष पाहणी दौÚयात घेतला.

रूग्णालयातील ओपीडी विभाग, ए. आर.टी. सेंटर, सी.आर. सिस्टीम रेडियोलॉजी, डायलिसिस, अतिदक्षता विभाग, रक्तपेढी, ट्रामा सेंटर, थायलेसिमिया युनिट आदी ठिकाणी जाऊन वैद्यकीय अधिकारी, कर्मचाÚयांशी संवाद साधला. यावेळी आ. नाईक यांच्याकडे रूग्णालयाच्या नातेवाईकांनी काही समस्या मांडल्या.

दरम्यान या पाहणी दौÚयात रोटरी क्लब आणि थीम फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 3 लाख रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या थॅलेसिमिया डे केअर युनिटचे आ. नाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. उद्घाटनानंतर याविषयी बोलताना वाशीच्या पालिका रूग्णालयात ठाणे, पनवेल आदी ठिकाणचे विविध आजाराचे रूग्ण उपचारासाठी येतात. याची संख्या दिवसागणिक वाढत असतानाही महापालिकेने विशेषतरू वैद्यकीय पथकाने चांगली सेवा दिल्याबद्दल डॉक्टरांचे कौतुक केले.

यावेळी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परोपकारी व प्रशांत जवादे, नवनिर्वाचित आरोग्य समिती सभापती राजू शिंदे, स्थायी समिती सभापती रमेश शिंदे यांनी विविध समस्यांची माहिती आ. नाईक यांना दिली.

सध्या रूग्णालयात दोन डायलिसिस मशीन आहेत. परंतु त्यावर पडणारा भार पाहता आणखी 6 डायलासिस मशीन आवश्यक असल्याचे डॉ. जवादे यांच्या निदर्शनास आणून दिले. आ. नाईक यांनी यासाठी महासभेत तरतूद करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापतींना केल्या. अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या मशिन्स खरेदी करताना त्याचा सर्वसामान्य रूग्णांवर अधिभार लागणार नाही, याची काळजी घेण्याचे ते म्हणाले.

जनरल वॉर्ड विषयी आ. नाईक यांनी काही अंशी नाराजी व्यक्त करत वॉर्डची स्वच्छता आणि चांगल्या दर्जाचा आहार पुरविण्याच्या सूचना केल्या. प्रतिरूग्णाकरिता औषधांसाठी येणारा खर्च पाहता औषधांसाठी 15 लाखांची तरतूद करण्या विषयी महापौर-आयुक्तांशी येत्या आठवडाभरात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने जे.जे. हॉस्पिटल, के.ई.एम. येथे विविध उपक्रमांतर्गत सिटी स्कॅन व एमआरआय ही अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याच धर्तीवर वाशीच्या मध्यवर्ती रूग्णालयात या मशिन उपलब्ध करून देण्यासंबंधी मंत्रालयीन स्तरावर तसेच येत्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आ. नाईक म्हणाले.

न्युरो सर्जन, युरो सर्जन, प्लास्टिक सर्जन यांच्या नेमणुकीचे अधिकार रूग्णालयाला देण्यासंबंधी या दौÚयात चर्चा झ्ााली. त्याचबरोबर डॉ. परोपकारी यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध देण्याची मागणी केली. यावर आ. नाईक यांनी नियुक्तीविषयक कारवाई सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

नेरूळ, ऐरोली येथील पालिका रूग्णालयाचाही आढावा घेणार असल्याची माहिती यावेळी आमदारांनी दिली.

ठाणे, मुंबई महापालिका रूग्णालयामध्ये असणाÚया विविध आजार निदान मशिन्सचा स्वतरू आढावा घेऊन आगामी काळात अशा मशिन वाशीच्या रूग्णालयात नवी मुंबईकरांसाठी उपलब्ध करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

ठाणे महापालिकेप्रमाणे नवी मुंबई महापालिकेचेही मेडिकल कॉलेज उभारण्याच्या विषयांवर स्वतरू जातीने लक्ष घालून याविषयी पालकमंत्री ना. गणेश नाईक, खा.डॉ. संजीव नाईक, महापौर सागर नाईक यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. ऐरोलीच्या रूग्णालयात भाजलेल्या रूग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची उभारी, नेरूळच्या माता बाल रूग्णालयात नेत्र चिकित्सा उभारणीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सभापतींना दिले. रूग्णालयातील विविध समस्या आगामी तीन महिन्यात मार्गी लावणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जवादे, डॉ. अशोक वाघ, डॉ. जैन, डॉ. परेख, स्थायी समिती सभापती रमेश शिंदे, आरोग्य समिती सभापती राजू शिंदे, तसेच रोटरीचे व थीम फाऊंडेशनचे अधिकारी उपस्थित होते.