विधानसभेत आमदार संदिप नाईक यांची ज¨रदार मागणी
... अन्यथा ल¨कप्रतिनिधी व नगरसेवक यांच्या उपस्थितीत उप¨षण करणार

नवी मुंबईतील रहिवाशांचा अत्यंत महŸवपूर्ण प्रश्न असलेल्या सिडक¨च्या निकृ दर्जाच्या इमारतींचा प्रश्न आज राªवादी काँग्रेसचे युवा आमदार संदीप नाईक यांनी मांडला. सिडक¨ने बांधलेल्या इमारतींचे बांधकाम निकृ दर्जाचे असल्याने या इमारतींना 2.5 एफएसआय मंजूर करुन त्यांच्या पुनर्बांधणीचे काम शासनाने तातडीने हाती घ्यावे, अशी ज¨रदार मागणी त्यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे क¢ली. दरम्यान, याप्रश्नी मुख्यमंत्री येत्या काही दिवसात निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे अन्यथा नवी मुंबईतील ल¨कप्रतिनिधी व नगरसेवक यांच्या उपस्थितीत उप¨षणाचा मार्ग अवलंबवू, अशी माहिती आ. नाईक यांनी दिली.
विधानसभेत आ. संदीप नाईक यांनी नवी मुंबईतील सिडक¨ने बांधलेल्या इमारतींचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, नवी मुंबईतील सिडक¨ने बांधलेल्या इमारतींना तीन-चार वर्षांतच तडे पडलेले आहेत. वारंवार स्लॅब क¨सळल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे जीवितहानी ह¨ण्याची शक्यता आहे. रहिवाशी जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. सिडक¨कडे वारंवार तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष ह¨त आहे. यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे. त्याचा क¢व्हाही उद्रेक ह¨ऊ शकत¨, असे सांगून आ. नाईक यांनी सभागृहाचे लक्ष वेधत सिडक¨च्या या इमारतींना 2.5 एफएसआय (चटई क्षेत्र) मंजूर करुन त्यांच्या पुनर्बांधणीचे काम शासनाने तातडीने हाती घ्यावे, अशी ज¨रदार मागणी त्यांनी क¢ली.

नवी मुंबईतील सिडक¨ने बांधलेल्या इमारतींचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याप्रश्नी आतापर्यंत पालकमंत्री ना. गणेश नाईक व आमदार संदीप नाईक यांनी शासन दरबारी सविस्तर माहिती सादर करीत या इमारतींना 2.5 एफएसआय (चटई क्षेत्र) मिळण्याच्या मागणीबाबत पाठपुरावा क¢ला आहे. पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या पुढाकारानेे याप्रश्नी तत्कालिन मुख्यमंत्री अश¨क चव्हाण त्याचबर¨बर विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज च©हान यांच्या घेतलेल्या भेटीत वरील मागणी क¢ली ह¨ती. त्यावेळी मुख्यमंत्री च©हाण यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत शहराचा द©रा करण्याचे आश्वासन दिले ह¨ते. तर आ. संदीप नाईक यांनी सिडक¨चे अध्यक्ष प्रम¨द हिंदुराव यांची भेट घेऊन सिडक¨ इमारतींच्या निकृष्ठ बांधकामाची माहिती देत या इमारतींना 2.5 एफएसआय (चटई क्षेत्र) मिळण्याची मागणी क¢ली ह¨ती. त्यानंतर आज पुन्हा हाच मुद्दा आ. संदीप नाईक यांनी विधानसभेत उपस्थित करीत सभागृह व शासनाचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, याबाबत ब¨लताना आ. संदीप नाईक यांनी, याप्रश्नी मुख्यमंत्री येत्या काही दिवसात निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे अन्यथा नवी मुंबईतील ल¨कप्रतिनिधी व नगरसेवक यांच्या उपस्थितीत उप¨षणाचा मार्ग अवलंबवू असे त्यांनी सांगितले.