नमुंमपाच्या आगामी बजेटमध्ये गाव आणि गावठाणाच्या विकासासाठी विशेष तरतूद
शहरी भागासोबतच गाव आणि गावठाण भागांचाही सुनियोजित आणि समतोल विकास व्हायला हवा, यासाठी लोकनेते गणेश नाईक यांच्या धोरणानुसार पालिकेच्या येत्या अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली असून त्यासंबंधी कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर जयवंत सुतार यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका छाया म्हात्रे यांच्या प्रभागातील रस्ते, पदपथ, मलनिंस्सारण वाहिन्या आदी नागरी कामांचा शुभारंभ आमदार नाईक, नगरसेवक देविदास हांडे-पाटील, स्थानिक नगरसेविका छामा म्हात्रे,नगरसेवक भारती पाटील, नगरसेविका संगीता म्हात्रे, नगरसेवक मुनावर पटेल, ऍड. पी. सी.पाटील, मा कार्मक्रमाचे आमोजक माजी नगरसेवक तथा कोपरखैरणे तालुका अध्मक्ष केशव म्हात्रे, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील,माजी नगरसेवक रविकांत पाटील,नवी मुंबई सेवादल महिला अध्मक्षा आशाताई शेगदार, प्रभाग समिती सदस्म शिरीष पाटील, कोपरखैरणे तालुका उपाध्मक्ष अवतार बिंद्रा, मुवक जिल्हा उपाध्मक्ष महेश पाटील, प्रभाग क्रमांक ४० चे वॉर्ड अध्मक्ष शरद पाटील, प्रभाग क्रमांक ४१ चे वॉर्ड अध्मक्ष आत्माराम पाटील, प्रभाग क्रमांक ४० च्मा महिला वॉर्ड अध्मक्षा उज्वला जाधव,सेवादल उपाध्मक्ष दिनेश म्हात्रे, सेवादल उपाध्मक्ष मोहन बोबडे, समाजसेवक इकबाल कवारे आदी मान्मवर उपस्थित होते.
नगरसेविका छाया म्हात्रे आणि माजी नगरसेवक केशव म्हात्रे प्रभागात नागरी सुविधा पुरविण्यासाठी तळमळीने काम करीत असल्याचे आमदार नाईक म्हणाले. नवी मुंबईत शहरी भागाप्रमाणेच २९ गावे असून या गावांमध्ये शहरी भागाच्या तुलनेत नागरी सुविधा पुरविण्यासाठी पालिका अर्थसंकल्पात विशेष तरतूद असणे गरजेचे आहे, असे आमदार नाईक म्हणाले. लोकनेते नाईक यांच्या दुरदृष्टीने नवी मुुंबईत अनेक वैशिष्टपूर्ण सुविधा प्रकल्प उभे राहिले, असे सांगून महापौर सुतार यांनी स्वच्छता सर्व्हेक्षणादरम्यान नागरिकांनी त्यांना विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांची माहितीपूर्ण आणि सकारात्मक उत्तरे द्यावीत, असे आवाहन केले. नवी मुंबईला विकासाच्या उंचीवर नेवून ठेवण्याचे काम सर्वांना मिळून करायचे आहे, असे मत मांडले.