ऐरोलीचे जैवविविधता केंद्र आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ बनावफे
ऐरोली येथील जैवविविधता केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ बनावे, अशा शुभेच्छा आमदार संदीप नाईक यांनी दिल्या आहेत.जागतिक पानथळ दिनानिमित्त या केंद्रात कांदळवन विभागाच्या वतीने छायाचित्रण आणि इतर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यांचा बक्षिस वितरण कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार नाईक यांनी पानथळ जागा, कांदळवण संरक्षण व संवर्धना विषयी मौलिक सूचना केल्या.कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, तहसिलदार अधिक पाटील, जिल्हा वन अधिकारी पंडीतराव, वन अधिकारी मकरंद घोडके, वनशक्ती संस्थेचे श्री स्टॅलिन, श्री. मयूर, समाजसेवक सीताराम मढवी, समाजसेवक दिपक पाटील, समाजसेवक राजेश मढवी आदी मान्यवर उपस्थित होते. जैवविविधता परिसरातील विविध पशु -पक्ष्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचा शब्दकोष तयार करणे उपयुक्त ठरेल. कांदळवनाबाबतची समग्र माहिती ई लायब्ररीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविता येईल, अशी सूचना आमदार नाईक यांनी केली. ऐरोलीच्या जैवविविधता केंद्राला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढते आहे. परदेशी पर्यटक देखील येत आहेत. त्यामुळे या केेंद्रात आधुनिक सुविधा पुरविण्याची गरज असून आमदार निधीतून ई टॉयलेटसाठी निधी दिल्याची माहिती आमदार नाईक यांनी यावेळी दिली.
निसर्गाबद्दल मनापासून स्वामित्वाची भावना निर्माण झाली तरच वनसंवर्धन स्थायी स्वरुपाचे होईल, असे मत विभागीय आयुक्त डॉ.पाटील यांनी मांडले. वन चळवळ ही लोक चळवळ व्हावी, अशी इच्छा व्यक्त करुन कांदळणावर भराव टाकणार्‍या व्यक्तींविरोधात दंडात्मक आणि फौजदारी स्वरुपाची कडक कारवाई सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.