घणसोली नोड सर्व सुविधामुक्त बनेल
आमदार संदीप नाईक यांचा विश्‍वास
घणसोली नोड भविष्मात सर्व नागरी सुविधामुक्त बनेल, असा विश्‍वास आमदार संदीप नाईक मांनी व्मक्त केला आहे. नगरसेवक घनश्माम मढवी मांच्मा प्रभागातील रस्ते पदपथ गटारे अंगणवाडी सुशोभीकरण आदी नागरी कामाचा शुभारंभ आमदार नाईक मांच्मा शुभ हस्ते झाला. त्माप्रसंगी ते बोलत होते. लोकनेते गणेश नाईक मांच्मा विकासाच्मा व्हिजनमुळे नवी मुंबईची सर्वांगीण प्रगती होत आहे. मागील काही काळात जो विकास कामाचा अनुशेष राहिला आहे. तो नजीकच्मा कालरावधीत भरून काढला जाईल. नगरसेवक मढवी मांनी मागणी केल्माप्रमाणे मा प्रभागात सांस्कृतिक भवन आगरी कोळी भवन रुग्णालमासाठी प्रशस्त जागा मासाठी निश्चित प्रमत्न करू, अशी ग्वाही आमदार नाईक मांनी दिली.

कंडोनियमच्या कामांचा विषय तडीस नेणार
- आमदार संदीप नाईक यांचा विश्‍वास
कोपरखैरणे भागात अल्पउत्पन्न गटासाठी सिडकोने बांधलेल्या कंडोनियम वसाहती मोठया संख्येने असून या वसाहतींमधील नागरी सुविधांच्या कामांचा थांबलेला विषय तडीस नेवू, असा विश्‍वास आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केला.
कोपरखैरणे, सेक्टर ४ प्रभाग क्रमांक ३७ मध्ये आमदार संदीप नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीतून वाचनालयाचे आणि प्रभागनिधी व नगरसेवक निधीतून विविध नागरी कामांचा शुभारंभ आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास नगरसेविका सायली शिंदे, समाजसेवक नारायण शिंदे,प्रभाग क्रमांक ३८चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष किशोर पाटील, समाजसेवक राजेंद्र ओव्हाळे, प्रभाग क्रमांक ३७ चे वॉर्ड अध्यक्ष माणिक शिंदे, समाजसेवक केशव गायकवाड तसेच जय भवानी ओनर्स असोसिएशन, त्रिमूर्ती, साईकृपा, साईनिवास, सुयोग्य, नवजवान, सद्गुरु, साईप्रसाद आदी असोसिएशनचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन
आ.संदीप नाईक यांचे प्रतिपादन
कोपरखैरणेतील विद्यादीप विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन
विद्यार्थ्मांच्मा अंगी असणार्‍मा कलागुणांना वाव देण्मासाठीच स्नेहसंमेलनाचे प्रमोजन असते. विद्यार्थी जीवनात शाळेचे स्नेहसंमेलन ही विद्यार्थ्मांसाठी एक पर्वणीच असते. विद्यार्थी नेहमी त्माची वाट पाहत असतात. कारण त्मामध्मे त्मांना आपल्मा अंगच्मा नर्तन, गामन, वादन, नाटम मा कला सादर करावमाच्मा असतात व त्मातून स्वत:ला सिध्द करावमाचे असते. अनेक मोठ मोठे कलावंत त्मांना त्मांच्मा बालपणी शाळेचे हे दालन उपलब्ध झाल्मामुळेच घडले आहे, असे प्रतिपादन आ.संदीप नाईक मांनी काढले.

व्हिक्ट्री व्हिजन, मोहिनी आर्टच्या राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेतून नवोदितांना मिळाले 100व्यासपीठ
आ.संदीप नाईक, कलाकर अरुण कदम, रवी वाडकर यांच्याकडून कौतुकाची थाप
व्हिक्ट्री व्हिजन आणि मोहिनी आर्ट ऍकेडमी अनेक वर्षांपासून नवी मुंबई क्षेत्रात नवोदितांना नाटयक्षेत्रात पदार्पण करणार्‍या नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता, बालनाटय, एकांकिका, दिर्घांक अशा विविध माध्यमातून अभिनयाची संधी उपलब्ध करून देत नाटयक्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहे.
व्हिक्ट्री व्हिजन आणि मोहिनी आर्ट ऍकेडमी च्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने, राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेचे आयोजन, ऐरोली येथे करण्यात आले होते. या राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेचे उद्घाटन ऐरोली विधानसभेचे आमदार संदीप नाईक, सिनेअभिनेते अरुण कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक, ज्येष्ठ नाटककार रवी वाडकर, राजेश मढवी उपस्थित होते.

सार्वजनिक उपक्रम समितीची सिडको महामंडळास भेट
महाराष्ट्र विधानमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीने १७ जानेवारी रोजी सिडको महामंडळास भेट दिली. या भेटीच्या निमित्ताने समितीच्या सदस्यांनी सिडको अधिकार्‍यांशी विविध प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच समितीकडे असलेल्या विषयांबाबत विस्तृत चर्चा केली.
मावेळी डॉ.अनिल बोंडे (विधानसभा सदस्म तथा समिती प्रमुख), विधानसभा सदस्य संदीप नाईक, सदस्या माधुरी मिसाळ, सदस्म विजम काळे, सदस्म हेमंत पाटील, सदस्म अमित झनक, सदस्म हनुमंत डोळस, सदस्म किरण पावसकर, सदस्म आनंदराव पाटील, सदस्म हुस्नबानू खलिफे, एन.आर.थिटे (उपसचिव), ए.बी.रहाटे (अवर सचिव) व मंगेश पिसाळ (कक्ष अधिकारी) आदी उपस्थित होते.

आमदार संदीप नाईक यांचा ऐरोलीतील उद्यान आणि मैदानाचा पाहणीदौरा

आमदार संदीप नाईक यांनी ऐरोली सेक्टर ३ येथील राजीव गांधी उद्यान आणि आनंद दिघे मैदानाचा पाहणीदौरा केला. या पाहणी दौर्‍याप्रसंगी स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या.
वॉकींग ट्रॅकचे रूंदीकरण करावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरूंगुळा केंद्र, रात्रीच्मा वेळेस विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे, खेळाच्या मैदानाचा विस्तार करणे, सुरक्षा रक्षकाची नियमित उपस्थित, पोलिसांची नियमित गस्त आदी मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती आमदार नाईक यांना करण्यात आली. आमदार नाईक यांनी त्यांना समस्या निवारणाची ग्वाही दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष हिरामण नाईक, राष्ट्रवादीचे अनिल नाकते, मानवता एकता संस्थेचे कुमार थोरात, मनसेचे निलेश बाणखेले, एसीपी गायकवाड, राजू पाटील, बेरी सर,मानवता एकता संस्था, हास्य क्लब, पतंजली, योगा क्लास, हॉलीबॉल क्लब, ज्येष्ठ नागरिक संघटना, युवक व रहिवासी संघाचे पदाधिकारी या पाहणी दौर्‍याप्रसंगी उपस्थित होते.

दि. बा. पाटील यांना अपेक्षित प्रकल्पग्रस्तांसाठीच्या हिताचे धोरण मंजूर करुन घेवू
आमदार संदीप नाईक यांचे आवाहन

प्रकल्पग्रस्तांचे लढावू नेते दिवंगत दि. बा. पाटील यांना अपेक्षित प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे धोरण राज्य शासनाकडून मंजूर करुन घेवू त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची पराकाष्ठा करु, असे आवाहन आमदार संदीप नाईक यांनी केले आहे.
दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने ङ्गप्रकल्पांच्या आक्रमणात भूमीपुत्रांच्या गावठाणांचे आणि अस्तित्वाचे जतनफ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन कोपरखैरणे येथील शेतकरी समाज सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार नाईक यांनी आपली मते मांडली.
खारी कळवा प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मोरेश्‍वर पाटील, कामगार नेते श्याम म्हात्रे, ऍड. बाबाजी ठाकूर, तुषार गावडे, संपादक राजेंद्र घरत, माजी नगरसेवक दीपक पाटील, विकास पाटील, ऍड. पी. सी. पाटील, आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील आदी मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले होते.प्रकल्पग्रस्तांसाठी दि. बा. पाटील यांनी केलेेले कार्य आदर्शवत असून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची कार्यपध्दती प्रभावी होती, असे सांगून आमदार नाईक यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

वाशीतील प्रभाग ५८मध्ये नागरी सुविधांचा धुमधडाका लोकनेते गणेश नाईक यांच्या शुभहस्ते उद्घाटन नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाशीतील प्रभाग क्रमांक ५८ चे स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरे यांनी प्रभागातील नागरिकांसाठी विविध नागरी सुविधांची भेट दिली असून पूर्ण झालेल्या सुविधांचे उद्घाटन आणि उर्वरित नागरी कामांचा शुभारंभ लोकनेते गणेश नाईक यांच्या शुभहस्ते शनिवारी धुमधडाक्यात पार पडला. या कार्यक्रमास आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, पालिकेतील सभागृहनेते रविंद्र इथापे, पालिकेच्या विधी समितीचे सभापती गणेश म्हात्रे, माजी नगरसेविका शिल्पा मोरे, प्रजापिता ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाच्या सदस्या आदी मान्यवर उपस्थित होते. प्रियदर्शनी पिस पार्कचे नूतनीकरण करण्यात आले असून त्यामधील ओपन जीम, सेल्फी पॉईंट, कारंजे, लहान मुलांसाठी खेळणी व बेंचेस या सुविधांचे लोकनेते नाईक यांनी उद्घाटन केले तर पदपथ रुंदीकरण, निवारा शेड आदी सुविधांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. प्रभागातील नागरिकांसाठी सुविधांची कामे करु शकलो याविषयी नगरसेवक मोरे यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले.

आरटीओसाठी इतरत्र भूखंड देण्यास सिडको राजी
आमदार संदीप नाईक यांनी घेतली एमडींची भेट
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सिडको सकारात्मक
नेरुळ सेक्टर १९ अ येथे सिडकोने आरटीओला भूखंड दिला आहे. या भूखंडावर आरटीओ कार्यालय आणि टेस्टिंग ट्रॅक तयार करण्यात येत असून त्यामुळे या परिसरातील नागरी वस्ती, शाळा, महाविद्यालय, वंडर्स पार्क उद्यानात येणार्‍या नागरिकांना विविध  त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबईचे पालिकेतील सभागृहनेते रवींद्र इथापे आणि परिसरातील नागरिकांनी नेरुळ येथे होणार्‍या आरटीओ कार्यालयाला विरोध केला आहे.  या सर्वांनी आमदार संदीप नाईक यांच्याकडे हा विषय उपस्थित केला असता सोमवारी  आमदार नाईक यांनी सिडकोचे व्यस्थापकीय-संचालक भूषण गगराणी यांची भेट घेतली. आमदार नाईक आणि गगराणी यांच्या चर्चेनंतर श्री. गगराणी यांनी आरटीओ कार्यालयासाठी इतरत्र भूखंड देण्यास तयार असल्याचे आमदार नाईक यांना सांगितले. याप्रसंगी प्रकल्पग्रस्तांच्या जिव्हाळयाच्या  मागण्यांवर देखील आमदार नाईक यांनी चर्चा केली.

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर आमदार संदीप नाईक यांनी शासनाकडून मिळविले ठोस आश्‍वासन

विधीमंडळ अधिवेशनात नवी मुंबईकरांच्या महत्वाच्या मागण्यांवर कार्यवाहीची ग्वाही

राज्य विधीमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबईकरांच्या महत्वाच्या प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासनाकडून ठोस आश्‍वासन मिळविले असून विशेषतः तारांकीत प्रश्‍न, पुरवणी मागण्यांवरील चर्चा, अर्धा तास चर्चा इत्यादींच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आणि नवी मुंबईकरांच्या इतर जिव्हाळयाच्या मागण्यांविषयी सरकारला सकारात्मक भुमिका घ्यावी लागली आहे.

एसएससी सराव परिक्षेत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग
बारावीसाठीही सराव परिक्षा घेण्याचे लोकनेते गणेश नाईक यांचे सुतोवाच
नवी मुंबई शिक्षण संकुल आणि श्रमिक शिक्षण मंडळ आयोजित एसएससी बोर्डाच्या धर्तीवरील एसएससी सराव परिक्षेस यावर्षी १२ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले असून मागील ११ वर्षात एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परिक्षा देवून एसएससीच्या मुख्य परिक्षेत धवल यश प्राप्त केले आहे.
तुर्भे येथील सामंत विद्यालयात शनिवारी लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत एसएससी सराव परिक्षेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, परिक्षेचे आयोजक आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, सभागृहनेते रविंद्र इथापे, जिल्हाध्यक्ष आणि परिक्षेचे मुख्य प्रबंधक अनंत सुतार, नगरसेविका शशिकला पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक पाटील, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेशदादा नाईक, मुख्याध्यापक सुधीर थळे, प्राचार्य तथा परिक्षेचे मुख्य समन्वयक प्रताप महाडीक, मुख्याध्यापक राठोड, शेतकरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी राजाराम भोईर, संजय पाटील, शांतराम घरत, गोपिनाथ पाटील, राम पाटील, पार्श्‍वा एज्यु मेंटोरचे समीर घोटालीया, समाजसेवक परशुराम ठाकूर, सेवादल उपाध्यक्ष मोहन बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

गरजेपोटीच्या घरांना संरक्षण देण्यासाठी जास्तीत जास्त निर्णय घेवू

आमदार संदीप नाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  ग्वाही

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार संदीप नाईक यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जोरदारपणे मांडून सरकारकडून त्यावर सकारात्मक कार्यवाहीचे आश्‍वासन मिळविले आहे. मंगळवारी त्यांनी या संदर्भात सभागृहात अर्धा तास चर्चा घडवून आणली. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे भूमिपुत्रांमुळेच नवी मुंबईत सिडको उभी राहिल्याचे मान्य करुन या प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या घरांना संरक्षण देण्यासाठी जास्तीत जास्त निर्णय घेवू, अशी ग्वाही दिली आहे. चालू अधिवेशनात आमदार नाईक यांनी आत्तापर्यंत तारांकीत प्रश्‍न, पुरवणी मागण्यांवरील चर्चा आदींच्या माध्यमातून नवी मुंबईच्या जिव्हाळयाचे विषय सभागृहात अभ्यासूपणे मांडले आहेत.

तुर्भे उडडाणपुलाचे काम करण्याची सरकारची तयारी
ऐरोली ब्रीज ते कटाई नाका उन्नत मार्गाचे कामही लवकर सुरु होणार
आमदार संदीप नाईक यांच्या मागणीला मंत्री रणजीत पाटील यांचे उत्तर
नवी मुंबई पालिका क्षेत्रात वाहतूककोंडीवर उपाययोजना व्हावी तसेच नागरिकांना जलद सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार संदीप नाईक सातत्याने शासकीय पातळीवर प्रयत्नशील आहेत. विधीमंडळ अधिवेशनांमधून त्यांनी या विषयीचा यशस्वीपणे पाठपुरावा केला आहे.
जुना मुंबई-पुणे मार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्गावरील एमएमआरडीएने हाती घेतलेल्या प्रकल्पांविषयी गुुरुवारी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार संदीप नाईक आणि इतर सदस्यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना चर्चेला आली असता आमदार संदीप नाईक यांनी या चर्चेत सहभाग घेवून तुर्भे उड्डाणपूल, ऐरोली ब्रीज (ठाणे-बेलापूर मार्ग) ते कटाई नाका यांना जोडणारा उन्नत मार्ग आणि घाटकोपर ते कोपरखैरणे यांना जोडणारा उडडाणपूल ही तीन कामे कधी हाती घेणार? अशी विचारणा सरकारला त्यांनी केली.

समुह विकास योजनेत प्रकल्पग्रस्तांच्या हरकती व सुचनांच्या समावेशासाठी लवकरच बैठक
आमदार संदीप नाईक यांना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची ग्वाही
डंपिंग ग्राउंडचा भुखंड नाममात्र दराने नवी मुंबई पालिकेला देण्याबाबत

तात्काळ कार्यवाही करण्याचे शासनाचे आश्‍वासन नवी मुंबईच्या जिव्हाळयांच्या प्रशांची सोडवणूक करण्यासाठी आमदार संदीप नाईक हे  शासन स्तरावर आणि विधीमंडळ अधिवेशनामधून सातत्याने प्रयत्नशिल आहेत. विधीमंडळ अधिवेशनात सोमवारी नगरविकास आणि महसूल खात्यावरील पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना आमदार संदीप नाईक यांनी पुन्हा एकदा नवी मुंबईच्या जिव्हाळयाचे प्रश्‍न सोडविण्याची जोरदार मागणी सभागृहात केली. त्यांच्या मागणीवर शासनाने सकारात्मक उत्तर दिले असून समुह विकास योजनेची  अंतिम अधिसूचना काढण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या हरकती आणि सूचनांच्या समावेशाबाबत आपण लवकरच आ. संदीप नाईक यांच्या सोबत बैठक आयोजित करुन प्रकल्पग्रस्तांना दिलासा देवू अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आमदार नाईक यांना दिली तर डंपिंग ग्राउंडचा भुखंड नाममात्र दराने नवी मुंबई महापालिकेला देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्‍वासन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले आहे.

नवी मुंबई शहरात प्रदूषण असल्याची सरकारची कबुली
आमदार संदीप नाईक यांच्या तारांकीत प्रश्‍नाला पर्यावरणमंत्र्यांचे लेखी उत्तर
एका कंपनीला उत्पादन बंदचे आदेश
९ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस
गेल्या काही महिन्यांमध्ये नवी मुंबई शहरात वाढलेल्या जल आणि वायू प्रदूषणाचा गंभीर विषय तारांकीत प्रश्‍नाच्या माध्यमातून आमदार संदीप नाईक यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी मांडला असता शहरातील प्रदूषणाबाबत सरकारने कबुली दिली असून यावर कारवाई करीत एका कंपनीला उत्पादन बंदचे आदेश देण्यात आले आहेत. तर ९ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची लेखी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.

ग्रामस्थांच्या हिताची आणि सर्वसमावेशक समूह विकास योजना जाहीर केली नाही

तर जनआंदोलन आमदार संदीप नाईक यांचा सरकारला इशारा

समूह विकास योजनेचा अंतिम निर्णय लवकरच होण्याचे संकेत आमदार संदीप नाईक यांच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

नवी मुंबई गावठाण आणि गावठाण विस्ताराच्या समूह विकासाबाबत अंतिम निर्णय लवकरच होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संदीप नाईक यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिले आहेत. ही योजना ग्रामस्थांच्या हिताची आणि सर्व घटकांसाठी सर्वसमावेशक असली पाहिजे. प्रकल्पग्रस्तांच्या हरकती आणि सूचनांचा त्यामध्ये समावेश करूनच अंतिम अधिसूचना काढावी, अन्यथा मोठे जनआंदोलन उभे करू, असा इशारा आमदार नाईक यांनी सरकारला दिला आहे. २०१५ पर्यंतची राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची अधिसूचना २५ जुलै २०१७ रोजी शासनाने काढली. नवी मुंबईतील गावठाण आणि गावठाण विस्तार क्षेत्राचा पुनर्विकास हा समूह विकास योजनेतून करण्यात येणार आहे. मात्र या समूह विकास योजनेबाबत प्रकल्पग्रस्तांचे काही आक्षेप असून त्यामध्ये अनेक त्रुटी देखील आहेत. राज्याची आणि नवी मुंबईची परिस्थिती वेगळी आहे.  ग्रामस्थांच्या  सूचना आणि हरकतींचा समावेश या योजनेत करावा.

ठाणे-तुर्भे मार्गावरील प्रवास १५ ते २० मिनिटांवर येणार
दोन उडडाणपूल आणि भुयारी मार्ग मार्च-२०१८ पर्यत सुरु होणार
आमदार संदीप नाईक यांनी केला सुविधांचा पाहणीदौरा
लोकनेते गणेश नाईक यांच्या पुढाकाराने आणि आमदार संदीप नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर पूर्णत्वाकडे जात असलेले दोन उडडाणपूल आणि एक भुयारी मार्ग येत्या मार्च २०१८पर्यत वाहतुकीसाठी खुले होणार असून त्यामुळे ठाणे ते तुर्भे हा प्रवास आता १५ ते २० मिनिटांवर येणार आहे. आमदार संदीप नाईक यांनी मंगळवारी या पायाभुत सुविधांचा पाहणीदौरा करुन या कामांबाबत समाधान व्यक्त करतानाच काही उपयुक्त सुचना एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना केल्या. महापौर जयवंत सुतार, पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमएमआरडीएचे उप अभियंता जी. व्ही. राठोड, सल्लागार डी. व्ही. शेंडे, पालिकेचे अधिकारीवर्ग आदी त्यांच्यासमवेत होते.

नवी मुंबईतील प्रदुषणावर नियंत्रण ठेवा
आमदार संदीप नाईक यांनी प्रदुषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकार्‍यांना खडसावले

गेल्या तीन वर्षात नवी मुंबई शहरातील पाणी आणि हवेच्या प्रदुषणात वाढ झाली असून त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाची(एमपीसीबी) आहे. मात्र हे बोर्ड अंग झटकताना दिसते. त्यामुळे बोर्डाच्या अधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे आपले काम करुन प्रदुषणकारी कंपन्यांवर कारवाई करावी, या शब्दात आमदार संदीप नाईक यांनी एमपीसीबीच्या अधिकार्‍यांना खडसावले.
गेल्या काही दिवसांत आमदार नाईक यांच्याकडे रहिवासी भागात प्रदुषण वाढल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी मंगळवारी लोकप्रतिनिधींसमवेत पावणे एमआयडीसी आणि येथील रासायनिक पाण्यावर प्रक्रीया करणार्‍या प्रकल्पाची(सीएटीपी) पाहणी केली. आमदार नाईक म्हणाले की, एमआयडीसी भागात सुमारे ३५०० कारखाने आहेत. या सर्वच कारखान्यांमधून निघणार्‍या रासायनिक पाण्यावर सीएटीपीमध्ये प्र्रक्रीया होेतेच असे नाही. अनेक कंपन्या त्यांचे प्रक्रीया न केलेले पाणी थेट नाल्यात सोडतात. आणि पाणीप्रदुषण करतात. हवेच्या प्रदुषणाचे देखील असेच आहे. रात्री १० नंतर नवी मुंबईच्या वातावरणात प्रदुषणकारी धुर अच्छादलेला असतो. बोलण्यास तोंड उघडले तरी श्‍वासोश्‍वासास त्रास होतो. रात्रभर या प्रदुषणकारी धुळ-धुक्याचा किती विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. एमपीसीबीने वरचेवर आणि वेळेवर जर कंपन्यांची तपासणी करुन प्रदुषण करणार्‍या कारखान्यांवर कारवाईचा बडगा उभारला तर

श्रमिक नगरची झोपडपट्टी होणार हगणदारी मुक्त मलनि:सारण वाहिन्या टाकण्याच्या कामाचा शुभारंभ
संत गाडगे बाबा नागरी अभियानाचा पुरस्कार मिळविणारी नवी मुंबई महानगरपालिका ही पहिली महापालिका आहे. त्यानंतर देशातील पहिल्या दहा स्मार्ट शहरात येण्याचा बहूमान देखील नवी मुंबई नगरीने मिळविला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही ऐरोली विधानसभ मतदार संघाचे आमदार संदीप नाईक यांनी दिली....

वीजपुरवठा सुरळीत करा
आमदार संदीप नाईक यांची मागणी

नवी मुंबईतील शहर आणि गावठाण क्षेत्रात गेली अनेक दिवस रोजच वीज पुरवठा खंडीत होतो आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास होत असून तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी लेखी मागणी आमदार संदीप नाईक यांनी महावितरणचे अधिक्षक-अभियंता श्री. मानकर यांना गुरुवारी वाशी येथील महावितरणच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटून केली आहे. ऑक्टोबर हिटमुळे सध्या वातावरणातील उकाडा कमालीचा वाढला आहे. विद्यार्थी वर्गाच्या...

आमदार संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून कोपरखैरणेत साकारलेल्या नवी मुंबईतील पहिल्या डिजीटल स्कुलचे उद्घाटन

लोकनेते गणेश नाईक यांच्या स्कूल व्हिजनमुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबरच पाश्‍चात्य शाळेत ज्या पध्दतीने शिक्षण दिले त्या आधुनिक पध्दतीने शिक्षण देण्यासाठी डिजीटल प्रणाली महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा पालिकेच्या माध्यमातून डिजीटल करण्याची घोषणा आमदार संदीप नाईक यांनी केली.

ज्यांच्या त्यागातून नवी मुंबईची निर्मिती झाली त्या प्रकल्पग्रस्तांच्या
पाल्यांना विनाविलंब विद्यावेतन सुरुच झाले पाहिजे
आमदार संदीप नाईक यांची मागणी
स्थानिकांच्याबांधकामांनासंरक्षणदेण्यासाठीसर्व्हेक्षणपूर्णकरा
प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली आहे. त्यांच्या पाल्यांना दिले जाणारे विद्यावेतन थांबवून सिडकोने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच अंधारात ढकलले आहे. हे विद्यावेतन तातडीने सुरु करा. प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाई त्वरीत थांबवून सिडकोमार्फत जे सर्व्हेक्षणाचे काम केले जात आहे ते कारवाईसाठी नसून या बांधकामांना संरक्षण देण्यासाठी व्हायला....

चित्ररथाच्या माध्यमातून वृक्षलागवडीची जनजागृती
राज्म शासनाच्या वतीने २०१७ मध्मे राज्मात ४ कोटी वृक्ष लागवड होणार आहे. वृक्षलागवडीचे महत्व सांगण्यासाठी चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून नवी मुंबईत या चित्ररथाचे मंगळवारी आगमन झाले होते.
ऐरोली येथे या चित्ररथाचे स्वागत आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, कोळी समाजाचे नेते चंदू पाटील, वन अधिकारी उपस्थित होते. ...

ग्रीनहोपसंस्थेच्यावतीनेमोफतवृक्षरोपांचेवाटप 
पर्यावरण संवर्धनात भरीव काम करणार्‍या ग्रीन होप या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने पर्यावरणप्रेमी नागरिक आणि संस्थांना सालाबादप्रमाणे या वर्षी देखील मोफत वृक्षरोपांचे वितरण करण्यात येणार आहे.
ग्रीन होप संस्थेच्या वतीने दरवर्षी नवी मुंबईत जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचे कार्यक्रम विधिध ठिकाणी आयोजित केले जातात. यावर्षी नेरुळ, कोपरखैरणे आणि ऐरोलीत कार्यक्रम पार पडले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती जनजागृती करण्यासाठी निबंध, चित्रकला इत्यादी स्पर्धाचे आयोजन...

विजेच्या समस्या १०० टक्के दूर करा आमदार संदीप नाईक यांची मागणी
महावितरणच्या मुख्य अभियंत्यांची घेतली भेट 

गेल्या काही दिवसात नवी मुंबईतील विविध भागात खंडीत होणारा वीजपुरवठा या आणि इतर महत्वाच्या वीज समस्यांची सोडवणूक करा, या मागणीसाठी शुक्रवारी आमदार संदीप नाईक यांनी महावितरणच्या भांडूप परिमंडळाच्या मुख्य अभियंत्या पुष्पा चव्हाण यांची वाशी येथील महावितरणच्या कार्यालयात भेट घेतली. वीज समस्या १०० टक्के नाहिशा करुन नागरिकांचे समाधान करावे, असे त्यांनी चव्हाण यांना सूचित केले. वीज उपकरणे दुरुस्तीची कामे पूर्ण करुन कर्मचारी भरतीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्य अभियंत्या चव्हाण यांनी याप्रसंगी आमदार नाईक यांना दिले.

ग्रीन होप संस्थेच्यावतीने पर्यावरणदिनी वृक्षारोपण
पर्यावरण संरक्षणाची घेतली शपथ

ग्रीन होप या पर्यावरणप्रेमी संस्थेच्यावतीने जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने सोमवारी शहरात तीन ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या सदस्यांनी आणि नागरिकांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
कोपरखैरणेतील निसर्गउद्यान परिसरात वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसच

ऐरोलीतील जैवविविधता केंद्राला जागतिक दर्जाचे बनवा|
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ऐरोली दिवा खाडीनजीक विकसित करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या सागरी व किनारी जैव विविधता केंद्राचे उद्घाटन रविवारी पार पडले. याप्रसंगी आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, कांदळवन विभागाचे मुख्य संवर्धक एन. वासुदेवन, वन विभागाचे सचिव विकास खरगे, ए के मिस्त्री, ज्यांच्या सल्ल्याने या केंद्राची निर्मिती करण्यात आली त्या जर्मन कंपनीचे जीआयएफचे मुख्य अधिकारी मायकेल वकिली, कांदळवन संरक्षक अधिकारी मधुकर घोडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते....

नवी मुंबईत कबड्डीच्या स्टेडियमसाठी प्रयत्नशील -आमदारसंदीपनाईक 
देशी खेळ असलेल्या कबडडीच्या सरावासाठी तसेच सामन्यांच्या आयोजनासाठी खास स्टेडियम निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती नवी मुंबई कबड्डी लीगचे अध्यक्ष आमदार संदीप नाईक यांनी दिली आहे. सलग दुसर्‍या वर्षी नवी मुंबईत नवी मुंबई कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजन ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने १३ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या भव्य प्रांगणात सायंकाळी ५ ते रात्री ११ यावेळेत करण्यात आले आहे. या वर्षी पुरुषांचे एकूण ८ संघ असून दोन संघांची यावर्षी वाढ झाली आहे...

ऐरोली-डोंबिवली मार्गाकरीता मंजुर्‍यांचे काम प्रगतीपथावर
आमदार संदीप नाईक यांच्या प्रश्‍नाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर 

नवी मुंबईतील नागरिकांना थेट डोंबिवली आणि डोंबिवलीतील नागरिकांना थेट नवी मुंबईत प्रवास करता यावा यासाठी प्रस्तावित ठाणे- बेलापूर ऐरोली ते डोंबिवली उन्नत मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, यासाठी आमदार संदीप नाईक शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. सदरच्या मार्गाचे काम प्रत्यक्षात कधी सुरु होणार आहे? असा लेखी प्रश्‍न अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले असून या मार्गासाठी लागणार्‍या विविध मंजुर्‍या घेण्याचे तसेच इतर अनुशंगिक कामे ....

नेरुळ येथे आरटीओ कार्यालय इमारतीच्या अंदाजपत्रकास मंजुरी
आमदार संदीप नाईक यांच्या प्रश्‍नाला शासनाचे उत्तर

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अपुर्‍या जागेत सध्या नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाचा (आरटीओ) कारभार सुरु आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सिडकोने आरटीओला दिलेल्या भुखंडावर नेरुळ येथे नविन कार्यालय केव्हां बांधण्यात येणार आहे? असा प्रश्‍न आमदार संदीप नाईक यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारला होता.

नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या सराव परिक्षेमुळे मुख्य परिक्षेत विद्यार्थ्यांना धवल यश
लोकनेते गणेश नाईक यांचे कौतुकोदगार

नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या एस.एस.सी.च्या सराव परिक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील मुख्य परिक्षेची भिती नाहिशी होवून आत्मविश्‍वास निर्माण होतो आणि मुख्य परिक्षेच्या निकालात अधिक चांगले यश प्राप्त होते, असे कौतुकोदगार लोकनेते गणेश नाईक यांनी काढले आहेत.

समुहविकास योजनेच्या नविन अधिसूचनेत ग्रामस्थांच्या सुचनांचा अंतर्भाव करावा ग्रामस्थांची घरे आणि धार्मिक स्थळांना दिलेल्या नोटीसा तातडीने मागे घ्याव्यात आमदार संदीप नाईक यांनी मांडली लक्षवेधी सुचना 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नवी मुंबईच्या निर्मितीसाठी ग्रामस्थांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने सिडकोला दिल्या. त्या ग्रामस्थांच्या सुचनांचा अंतर्भाव समुह विकास योजनेच्या नविन अधिसूचनेत करावा, अशी मागणी आज आमदार संदीप नाईक यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून विधीमंडळ अधिवेशनात केली. त्याचबरोबर शासनाने आश्‍वासित करुनही ग्रामस्थांची घरे आणि धार्मिक स्थळांना नोटीसा देण्यात येत आहेत या नोटीसा....

नवी मुंबई पालिका प्रभाग समित्यांवरील आणि सिडको कंडोमिनियमअंतर्गत कामांवरील बंदी उठवावी
आमदार संदीप नाईक यांची औचित्याच्या मुद्याद्धारे मागणी

आमदार संदीप नाईक यांनी शुक्रवारी विधानसभेत नवी मुंबईचे दोन महत्वाचे विषय औचित्याच्या मुद्याद्धारे विधानसभा अधिवेशनात मांडले. नवी मुंंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांवरील बंदी उठवावी तसेच सिडको वसाहती (कंडोमिनियम)अंतर्गत कामे करण्यास पालिकेला शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली....

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या शासन धोरणात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि दिघावासियांचा समावेश हवाच
आमदारसंदीपनाईकयांचीविधानसभेतमागणी 

राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या धोरणात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची आणि दिघावासियांची गरजेपोटीच्या बांधकामांचा समावेश व्हायलाच पाहिजे, अशी जोरदार मागणी आमदार संदीप नाईक यांनी आज विधीमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत केली.दिघ्यातील एमआयडीसीच्या जागेवरील सर्वसामान्यांच्या बांधकांमांविषयी आमदार संदीप नाईक यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना आज विधानसभा सभागृहात चर्चेला आली......

????????????????????????????????????

दिघावासिय आणि प्रकल्पग्रस्तांसाठी आमदार संदीप नाईक यांचे आंदोलन
विधानभवनआवारातनिदर्शने 

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी तसेच दिघा येथील सर्वसामान्यांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करावीत, या मागणीसाठी आमदार संदीप नाईक यांनी आज विधानसभा आवारात विरोधी पक्षाच्या आमदारांसह सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
सिडकोने वेळोवेळी गावठाण सर्व्हेक्षण केले नाही. काळाच्या ओघात प्रकल्पग्रस्तांची कुटुंब वाढली. त्यामुळे राहण्यासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी त्यांनी गरजेपोटी घरांचा विस्तार केला. आजपर्यतची ही बांधकामे नियमित करावीत आणि ग्रामस्थांच्य

कोपरखैरणे ते विक्रोळी पुलाचे काम लवकरच सुरु होणार
तुर्भ्यातील जनता मार्केटकडे जाण्यासाठी स्कायवॉक
आमदारसंदीपनाईकयांचापाठपुराव्याचेफलित 

पायाभूत सुविधांमुळे शहरविकासाला गती मिळत असते. नवी मुंबईत दळणवळणाच्या सोयी निर्माण व्हाव्यात यासाठी आमदार संदीप नाईक हे सातत्याने शासकीय पातळीवर पाठपुरावा करीत असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे कोपरखैरणे ते विक्रोळी या पुलाच्या कामास गती मिळाली असून हे काम लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे.त्याचबरोबरदोनरेल्वेस्थानकांच्यामध्येअसलेल्यातुर्भेतीलप्रसिध्दअशाजनतामार्केटकड

नेरुळ ते नविन भाऊ चा धक्का प्रवासी जलवाहतूक सुरु होणार
ठाणे जिल्हयातील जलवाहतूकीसाठी शासन सकारात्मक 
आमदारसंदीपनाईकयांच्यापाठपूराव्यालायश 

नवी मुंबईतील नेरुळ ते मुंबईतील नविन भाऊ चा धक्का या दरम्यान लवकरच प्रवासी जलवाहतूक सूरु होणार असून ठाणे जिल्हयातील शहरांना जलवाहतूकीने जोडण्यासाठी सर्वेक्षण करुन ही सेवा देखील सुरु करण्यात राज्य शासनाने सकारात्मक भुमिका घेतली आहे. आमदार संदीप नाईक यांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान आज विधानसभेमध्ये या संदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी दिलेले लेखी उत्तर आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या तोंडी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.

गावठाण आणि दिघ्याबाबत लवकरच निर्णय 
आमदार संदीप नाईक यांच्या मागणीवर नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांचे सकारात्मक उत्तर 

नवी मुंबईतील गावठाणांतील तसेच दिघा येथील बांधकामांविषयी लवकरच निर्णय घेवू, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी आमदार संदीप नाईक यांच्या नगरविकास खात्याच्या पुरवणी मागणीवर उत्तर देताना दिली. नगरविकास खात्याच्या पुरवणी मागण्यांसदर्भात आज पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत सुरु असलेल्या चर्चेत भाग घेत आमदार नाईक यांनी गावठाण आणि दिघ्याचा विषय मांडला...

कारवार्ई थांबवा, प्रकल्पग्रस्त आणि दिघावासियांच्या हिताची योजना आणा
आमदार संदीप नाईक यांनी औचित्याचा मुद्दा मांडून विधानसभेत जोरदार मागणी केली.

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि दिघा येथील पिडीत रहिवाशांच्या हिताची योजना तात्काळ आणावी आणि तोपर्यंत या रहिवाशांच्या बांधकामावर सुरू असलेली कारवाई त्वरीत थांबवावी, अशी जोरदार मागणी आ. संदीप नाईक यांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान आज औचित्याच्या मुद्याद्व्रारे विधानसभेमध्ये केली....

 

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठीआमदार संदीप नाईक यांचे आंदोलन 
नवीमुंबईबंदचाआवाजविधानभवनातकेलाबुलंद 

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी आमदार संदीप नाईक हे विधानसभेत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सिडको आणि महापालिका प्रकल्पग्रस्तांच्या वडीलोपार्जीत बांधकामांवर करीत असलेल्या कारवाईविरोधात सोमवारी प्रकल्पग्रस्त आणि इतर घटकांनी शहरात कडकडीत बंद पाळला. सोमवारीच राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनही सुरु झाले...

महावितरणने यापुढे कारभार सुधारला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु
- ‘जनसंवाद’ उपक्रमामध्ये आ.संदीप नाईक यांचा इशारा
- कोपरखैरणेवासीयांचा जनसंवाद उपक्रमाला भरगच्च प्रतिसाद
- उद्याने आणि विरंगुळा केंद्र, बीटचौकी, सीसीटीव्हीसाठी आमदार निधी देणार
- ४०० लेखी निवेदने सादर
 
कोपरखैरणे विभागासाठी आज (ता.१०) झालेल्या आ.संदीप नाईक यांच्या लोकहितवादी ‘जनसंवाद’ उपक्रमास नागरिकांची उत्स्फूर्त आणि भरगच्च उपस्थिती लाभली. नागरिकांनी विविध विषयांवरील आपल्या लेखी समस्या यावेळी मांडल्या. महावितरण..
सुलाईदेवी बनते प्रेक्षणीय पर्यटन स्थळ
तीन बंधाऱ्यांचे काम पूर्ण
 
नवी मुंबईतील स्थानिकांच्या धार्मिक श्रद्धेचे परंपरागत ठिकाण असलेले राबले एम.आय.डी.सी तील सुलाईदेवी हा निसर्ग संपन्न परिसर प्रेक्षणीय पर्यटन स्थळ बनत आहे.पर्यावरणाशी सुसंगत अशी कामे या ठिकाणी नवी मुंबई मागणंगपालिका, वन विभाग आणि आमदार संदीप नाईक यांच्या आमदार विकास निधीमधून सुरू आहेत. आमदार नाईक यांनी आज या परिसराचा पाहणी दौरा केला. आणि या ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. निर्सगाने भरभरून वनसंपदा दिलेल्या असा....

सर्वसामान्यांना दिले जाणारे रेशनिंगचे धान्य निकृष्ट दर्जाचे, किडे पडलेले
आमदार संदीप नाईक यांनी केला पर्दाफाश
धान्याच्या गोदामांना दिली अचानक भेट
 
सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारतर्फे दिले जाणारे रेशनिंगचे धान्य कशा प्रकारे दर्जाहीन आणि सडलेल्या अवस्थेत आहे. त्याचा पर्दाफाश आमदार संदीप नाईक यांनी तुर्भे येथील केंद्रीय वखार मंडळाच्या गोदामांना अचानक दिलेल्या भेटी दरम्यान झाला आहे.
वीज समस्या सोडविल्या नाहीत तर रस्त्यावर उतरू
आमदार संदीप नाईक यांचा महावितरणला इशारा
 
भाजपाचे सरकार आल्यानंतर वाढीव बिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच नवी मुंबई शहरामध्ये मोठया प्रमाणावर विजेच्या समस्या असून अघोषित भर नियमनाचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. महावितरणने भेडसाविणार्‍या समस्या तातडीने न सोडविल्यास रस्त्यावर उतरून महावितरण विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे. आज(ता.२१) मंगळवारी आ.नाईक यांच्या नेतृत्वाखाली...

नवी मुंबईच्या विकासात मुस्लिम धर्मियांचे मोठे योगदान
लोकनेते गणेश नाईक यांचे गौरवोद्गार

नवी मुंबईच्या आजवरच्या विकासात येथील मुस्लिम धर्मियांचे मोठे योगदान राहिले आहे. असे गौरवोद्गार लोकनेते गणेश नाईक यांनी आज (सोमवारी) कोपरखैरणे येथे झालेल्या रोजा इफ्तार दावत प्रसंगी काढले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, कोपरखैरणे मुस्लिम समाज आणि नगरसेवक मुनावर पटेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शेतकरी समाज सभागृहात पार पडला. ंडले.त्याला मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव....

प्रत्येकाने एक तरी झाड लावावे
आमदार संदीप नाईक यांचे पर्यावरणदिनी आवाहन
 
प्रत्येक नागरिकाने एक तरी झाड लावून ते जगवावे आणि पर्यावरण रक्षणात आपला हातभार लावावा, असे आवाहन आमदार संदीप नाईक यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागरिकांना केले.
आमदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन होप या स्वयंसेवी संस्थेने नवी मुंबईत निसर्ग संवर्धन आणि वृक्षारोपणाची मोठी मोहिम उभी केली आहे. ग्रीन होप, ऐरोली सेक्टर १९ मधील नेवा गार्डन रहिवासी, हरिओम जॉगर्स ग्रुप आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेवा गार्डन येथे आमदार नाईक यांच्या हस्ते पर्यावरणदिनाचेऔचित्य साधून खारफुटीचे रोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.  त्याप्रसंगी आमदार नाईक यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्व......