पाहणी दौर्‍यांमधून जनतेशी प्रत्यक्ष संवाद
पटणी मार्गाची सुधारणा

ठाणे-बेलापूर मार्गावरील विटावा नजीकच्या पटणी कंपनी परिसरातील रस्त्यांची लवकरात लवकर सुधारणा करावी, अशी सूचना एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना या रस्त्याच्या पाहणी दौर्‍याप्रसंगी केली.  या मार्गावर आवश्यक त्या सोयी-सुविधा लवकरात लवकर पुरविण्याचे आदेश दिले.
वळण रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला अपघात वळण विषयी माहिती फलक नसल्याने रात्रीच्या वेळेत येथे अनेक अपघात झाले आहेत. विद्युत दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळेस अंधारात चाचपडतच येथील प्रवास करावा लागतो त्याचा महिला प्रवाशांना विशेषतः त्रास होत असतो.
पटणी मार्गावर विद्युत दिवे बंद असतात. त्यामुळे अंधारातच मार्गक्रमण करावे लागते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. पादचारी मार्गालगत अपघात रोखण्यासाठी बॅरीगेट नसल्याने नागरिक अपघातात जखमी होत असतात. या बाबी  एमआयडीसीच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिल्या.या रस्त्यावरील पदपथांची लवकरात लवकर दुरुस्ती आणि  गटारांची दुरुस्ती करावी, रस्त्याच्या दुतर्फा सुरक्षा गार्ड बसवावेत, अशा सूचना  एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना केल्या.
सदर रस्त्याचे लवकरच डांबरीकरण होणार आहे. याविषयीचा प्रस्ताव तयार करुन एमआयडीसी कार्यालयाने त्यांच्या मुख्यालयाकडे पाठविला आहे.
सदर रस्ता नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्तावही एमआयडीसीने तयार केला आहे.

पावसाळापूर्व कामांना दिली गती
पावसाळापूर्व कामांचा आढावा तथा महापालिका हद्दीतील लहान मोठ्या नाल्यांची साफसफाई योग्य प्रकारे झाली आहे की नाही? याची पाहणी करण्याच्या उद्देशाने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे परिसराचा पाहणी दौरा केला.

पाहणी केलेली ठिकाणे
ऐरोली से. ३ मधील श्रीराम शाळेजवळील  मोठा नाला.
ऐरोली से १५ येथील जॉगिंग ट्रॅक.
घणसोली गावाचा मुख्य नाला.
घरोंदा-सिम्प्लेक्सला जोडणारा मुख्य नाला.

अधिकार्‍यांना दिलेले निर्देश...
उघड्या विद्युतवाहिन्या भूमिगत कराव्यात.
दूषित पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत
कोपरखैरणे से. २९ च्या मुख्य नाल्यातील गाळ काढावा

सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीचे निर्देश
तुर्भे येथील एनएमएमटीच्या बस डेपोला देखील भेट दिली. व्होल्व्हो बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यापैकी काही कॅमेरे तुटल्याचे तर काही नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आल्यावर असे कॅमेरे तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले.

सायन-पनवेल मार्गाची झाली डागडुजी
सायन-पनवेल मार्गावरील एस.के. व्हिल्स या वाहनांच्या शो रुमसमोरील रस्त्यावर गेले अनेक महिने खड्डे पडले होते. या रस्त्याचा  पाहणी दौरा केला. अधिकार्‍यांना सूचना केल्यानंतर या रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाचे काम लवकरच करण्यात येणार आहे.
नवी मुंबईत सिडको, सार्वजनिक बांधकाम खाते, एमआयडीसी आणि महापालिका यांच्या माध्यमातून रस्ते बांधले गेले आहेत. हे रस्ते नादुरुस्त होवून वाहतुककोंडी निर्माण होवू नये, अबालवृध्द प्रवाशांना त्रास होवू नये यासाठी रस्ते सुस्थितीत राहणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
विविध प्राधिकरणांच्या हद्दीच्या वादामुळे रस्त्यांची कामे रखडतात. त्यामुळे रस्त्यांचे मॅपिंग करण्याचे निर्देश दिले.

घणसोली पामबीच मार्गावर आमदार निधी मधून जॉगिंग ट्रॅक
ऐरोलीत साकारलेल्या इको जॉगिंग ट्रॅकच्या धर्तीवर घणसोली पामबीच मार्गावर आमदार निधीतून जॉगिंग ट्रॅक उभारण्यात येणार आहे. घणसोली येथील पामबीच मार्ग, अम्युजमेंट पार्क आणि तुर्भे येथील एनएमएमटी डेपोचा पाहणी दौरा केला.

घणसोली सेंट्रल पार्कसाठी शासनाकडून मंजूर केला विशेष निधी
नवी मुंबईचे लॅन्डमार्क ठरेल, असा घणसोली सेंट्रल पार्क प्रकल्प शासनाकडून विशेष निधी मंजूर करुन सुरु करुन घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला.
घणसोलीतील पामबीच मार्ग जॉगिंग ट्रॅकसाठी केलेल्या महत्त्वाच्या सूचना
रस्त्यांवरील पदपथ आणि दुभाजकांमध्ये उगवलेली झुडुपे काढून टाका
वेग नियंत्रणासाठी रम्बलर, रात्रीच्या वेळेस अधिक उजेड देणारे हायमास्ट दिवे
स्वच्छतागृहे, ज्येष्ठ नागरिक आणि इतर घटकांना बसण्यासाठी बाके उपलब्ध करा
रस्त्याच्या दोन्ही बाजूला जॉगिंग ट्रॅक, पदपथांचे सुशोभिकरण
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे गस्त पथक, बीट चौकी
जॉगिंग ट्रॅकमध्ये योगा करण्याची सोय.