आमदार संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून कोपरखैरणेत साकारलेल्या नवी मुंबईतील पहिल्या डिजीटल स्कुलचे उद्घाटन

लोकनेते गणेश नाईक यांच्या स्कूल व्हिजनमुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबरच पाश्‍चात्य शाळेत ज्या पध्दतीने शिक्षण दिले त्या आधुनिक पध्दतीने शिक्षण देण्यासाठी डिजीटल प्रणाली महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा पालिकेच्या माध्यमातून डिजीटल करण्याची घोषणा आमदार संदीप नाईक यांनी केली.

आमदार निधीमधून समतोल विकास
आमदार निधीतून ऐरोलीत नागरी सुविधा कामांचा शुभारंभ

आमदार निधीतून स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र मुहूर्तावर ऐरोलीमध्ये दोन महत्त्वपूर्ण नागरी सुविधा कामांचा शुभारंभ करण्यात आला. ऐरोली विधानसभा मतदारसंघात पर्यावरणपूरक वातावरण वृध्दींगत व्हावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. आमदार निधीतून सेक्टर १४ येथे पहिला इको जॉगिंग ट्रॅक ऐरोलीत साकारला आहे. हा जॉगिंग ट्रॅक जेथे संपतो तेथपासून पुढे ऐरोली डी मार्टजवळ नवीन जॉगिंग ट्रॅक आमदार निधीमधून होणार आहे. त्याच्या कामाचा शुभारंभ पार पडला. त्यानुसार जॉगिंग ट्रॅकचे काम सुरु झाले आहे.
ऐरोली जेट्टी येथे आगरी-कोळी बांधवांसाठी आमदार निधीतून हायमास्ट बसविण्यात येणार आहे. या हायमास्ट दिव्यामुळे जेट्टी भागात कामानिमित्त येणार्‍या आगरी आणि कोळी बांधवांची रात्रीच्या वेळेस सुरक्षितता राखली जाणार आहे.
नजीकच्या काळात ऐरोली जेट्टी परिसराचा विकास जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून करण्याचा मानस आहे.

घणसोली पामबीच मार्गावर जॉगिंग ट्रॅक
ऐरोलीत साकारलेल्या इको जॉगिंग ट्रॅकच्या धर्तीवर घणसोली पामबीच मार्गावर जॉगिंग ट्रॅकची निर्मिती केली जाणार आहे. ऐरोली, घणसोली आणि तुर्भे येथील विकास कामांचा पाहणी दौरा केला.

घणसोली सेंट्रल पार्क मधील योगा सेंटरसाठी आमदार निधी
घणसोलीत सेंट्रल पार्क साकारत आहे. या पार्कमधील योगा सेंटरसाठी आमदार निधी दिला आहे. नवी मुंबईचे लॅन्डमार्क ठरेल, असा हा प्रकल्प आहे. या पार्कसाठी शासनाकडून विशेष निधी देखील मिळवून दिला आहे.

कोपरखैरणेतील नागरिकांसाठी आमदार निधीतून ओपन जीम ऐरोली विधानसभा मतदार संघात सोयी-सुविधांची पूर्तता करण्याबरोबरच नागरिकांचे आरोग्य उत्तम कसे राहील, यावर आत्तापर्यंत भर दिला आहे. कोपरखैरणेतील प्रभाग क्रमांक ३३ आणि प्रभाग क्र. ३४ मधील रहिवाशांसाठी आमदार निधीतून ओपन जीमचे निर्माण केले आहे.
कै. शिवाजीराव अण्णासाहेब पाटील उद्यानात या ओपन जीमची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये व्यायामासाठी विविध प्रकारची उपकरणे बसविण्यात आली आहेत.ओपन जीममधील उपकरणे..

स्टेपर | फोर आर्म | ट्विस्टर मशिन | लॅप पूल डाऊन | चेस्ट प्रेस | लेग प्रेस | अपराईट सायकल | ऍप्स बोर्ड

कातकरी पाडयात सुधारणा
आदिवासी भाग असलेल्या कातकरी पाडयातील अंगणवाडीचा विकास विशेष निधीअंतर्गत आणि त्याचबरोबर या भागात आमदार निधी देवून सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही येथील नागरिकांना या भागातील पाहणी दौर्‍याप्रसंगी दिली आहे. त्या संबंधी कार्यवाही देखील सुरु झाली आहे.
या भागात आदिवासी निधीअंतर्गत सुरळीत वीजपुरवठा, पाणीपुरवठा तसेच नियमित साफसफाई केली जावी, अशी सूचना पालिकेच्या अधिकार्‍यांना केली आहे.
कातकरी पाडा येथे शौचालयाच्या निर्मितीसाठी आमदार निधी देण्याचे याप्रसंगी जाहीर केले. येथील नागरिकांना विविध सरकारी घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी धोरण तयार करण्याची सूचना महापौर सुधाकर सोनावणे आणि स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांना केली आहे.
या भागात काही विद्युत दिवे बंद अवस्थेत होते. ते निदर्शनास आल्यानंतर पालिकेचे विद्युत विभागाचे प्रमुख राव यांच्याशी संपर्क साधून हे दिवे त्वरीत सुरु करुन घेतले.
स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आणि छोटया नाल्यांची सफाई वर्षातून तीन वेळा करा.
स्वच्छतेसाठी कंडोनियम अंतर्गत पेव्हरब्लॉकची कामे सुरु करावीत.
ज्या घरांमध्ये साथीच्या आजाराचे रुग्ण आढळले आहेत त्या घरांच्या आजुबाजूच्या भागाचे सर्व्हेक्षण करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करा, असेही सांगितले.
रेंगाळलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा. अंतर्गत भागातील नालेसफाई करा, असे निर्देश दिले.

विकास कामांसाठी आमदार निधीचा वापर
आमदार निधीतून मतदारसंघात प्रस्तावित आणि प्रक्रियेतील
विविध विकास कामे (आकडे लाखात)

१. ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात स्थायी स्वरुपाची वैद्यकीय उपकरणे. १५.००
२. ऐरोली, सेक्टर-१९ येथील व्हिस पाम सोसायटी ते नेवा गार्डनपर्यंत समोरील पदपथ (जॉगिंग ट्रक). १५.००
३. गवळीदेव, सुलाईदेवी येथे विहिरीला संरक्षण भिंत व विद्युत खांब. १५.००
४. प्रभाग क्र. २६ जुन्या समाज मंदिराची दुरुस्ती.(दलित वस्ती राखीव निधी) १५.००
५. प्रभाग क्रमांक ३१ येथील घणसोली पाम बीच येथे आसन व्यवस्था व निवारा शेड (गजेबो). १५.००
६. घणसोली सेंट्रल पार्क उद्यानाचे सुशोभिकरण. १५.००
७. प्रभाग क्र. ३७, कोपरखैरणे, सेक्टर ३ येथे वाचनालय. १५.००
८. कातकरीपाडा खैरणे येथे शौचालये व बालवाडीची सुधारणा. १५.००
९. कोपरखैरणे, कलश उद्यान ते ऍक्सीस बँकपर्यंत पदपथ (जॉगिंग ट्रॅक). १५.००
१०. कोपरखैरणे येथील ऍक्सीस, बँक ते निसर्ग उद्यानपर्यंत पदपथ (जॉगिंग ट्रॅक). १५.००
११. प्रभाग क्रमांक ५६ येथील गावदेवी मैदानामध्ये सभामंडप. १०.००
१२. प्रभाग क्रमांक ५८, वाशी, सेक्टर-१४ येथे महानगरपालिकेच्या जागेवर चावडी. १५.००
१३. ऐरोली सेक्टर १० श्री गणेशकृपा सोसायटी ते स्वराज सोसायटी समोरील पदपथ (जॉगिंग ट्रक ). १५.००
१४. ऐरोली, सोसायटी ते ऐरोली डी मार्टपर्यंत पदपथ(जॉगिंग ट्रक). १५.००
१५. व्हीस पान सोसायटी ते आय.सी.आय.सी.आय.बँकेपर्यंत पदपथ(जॉगिंग ट्रक). १५.००
१६. कांचन जंगा ते कलश उद्यानपर्यंत पदपथ(जॉगिंग ट्रक) व सुशोभीकरण. ०५.००