तुर्भे उडडाणपुलाचे काम करण्याची सरकारची तयारी
ऐरोली ब्रीज ते कटाई नाका उन्नत मार्गाचे कामही लवकर सुरु होणार
आमदार संदीप नाईक यांच्या मागणीला मंत्री रणजीत पाटील यांचे उत्तर
नवी मुंबई पालिका क्षेत्रात वाहतूककोंडीवर उपाययोजना व्हावी तसेच नागरिकांना जलद सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार संदीप नाईक सातत्याने शासकीय पातळीवर प्रयत्नशील आहेत. विधीमंडळ अधिवेशनांमधून त्यांनी या विषयीचा यशस्वीपणे पाठपुरावा केला आहे.
जुना मुंबई-पुणे मार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्गावरील एमएमआरडीएने हाती घेतलेल्या प्रकल्पांविषयी गुुरुवारी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार संदीप नाईक आणि इतर सदस्यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना चर्चेला आली असता आमदार संदीप नाईक यांनी या चर्चेत सहभाग घेवून तुर्भे उड्डाणपूल, ऐरोली ब्रीज (ठाणे-बेलापूर मार्ग) ते कटाई नाका यांना जोडणारा उन्नत मार्ग आणि घाटकोपर ते कोपरखैरणे यांना जोडणारा उडडाणपूल ही तीन कामे कधी हाती घेणार? अशी विचारणा सरकारला त्यांनी केली.

नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी आमदार नाईक यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला सकारात्मक उत्तर देत याबाबत  परिपूर्ण प्रस्ताव येताच  आपण लवकरात लवकर प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.   तुर्भे जंक्शन येथे सध्या जी वाहतूककोंडी होते ती येथील उडडाणपूल तयार झाल्यावर कमी होणार आहे. ऐरोली व कटाई नाका यांना जोडणारा बोगदा व उन्नत मार्ग हा १२.३० किलोमीटर लांबीचा जोडरस्ता देखील एमएमआरडीएने हाती घेतला असून   त्याकरिता ९४४.२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. घाटकोपर ते कौपरखैरणे असा उडडाणपूल निर्माण होण्यासाठी देखील आमदार नाईक प्रयत्नशील असून या पुलामुळे मुंबईतून नवी मुंबईत आणि नवी मुंबईतून मुंबईत कमी वेळेत आणि जलद जाणे सोईस्कर होणार आहे.नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी आमदार नाईक यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला सकारात्मक उत्तर देत याबाबत  परिपूर्ण प्रस्ताव येताच  आपण लवकरात लवकर प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.   तुर्भे जंक्शन येथे सध्या जी वाहतूककोंडी होते ती येथील उडडाणपूल तयार झाल्यावर कमी होणार आहे. ऐरोली व कटाई नाका यांना जोडणारा बोगदा व उन्नत मार्ग हा १२.३० किलोमीटर लांबीचा जोडरस्ता देखील एमएमआरडीएने हाती घेतला असून   त्याकरिता ९४४.२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. घाटकोपर ते कौपरखैरणे असा उडडाणपूल निर्माण होण्यासाठी देखील आमदार नाईक प्रयत्नशील असून या पुलामुळे मुंबईतून नवी मुंबईत आणि नवी मुंबईतून मुंबईत कमी वेळेत आणि जलद जाणे सोईस्कर होणार आहे. भविष्यात उभे राहणार्‍या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर वाहतूककोंडी निर्माण होवू नये  यासाठी आमदार नाईक यांनी शासनस्तरावर आणि एमएमआरडीएकडे पाठपुरावा करुन ठाणे-बेलापूर मार्गावरील सविता केमिकल जंक्शन आणि घणसोली-तळवली नाका येथे उडडाणपूल तसेच महापे जंक्शन येथे भुयारी मार्ग मंजूर केला. ही कामे आता अंतिम टप्प्यात असून येत्या काही महिन्यातच हे मार्ग जनतेसाठी खुले होणार आहेत. तुर्भे उडडाणपूल,  ऐरोली ब्रीज (ठाणे-बेलापूर मार्ग) ते कटाई नाका यांना जोडणारा उन्नत मार्ग आणि घाटकोपर ते कोपरखैरणे उडडाणपूल ही तीन कामे पूर्ण झाल्यावर या मार्गावरील वाहतूक आणखी सुरळीत आणि जलद होण्यास मदत होणार असून प्रवासाच्या वेळेतही बचत होणार आहे.